Ayodhya Ram Mandir: 'पंतप्रधान मोदी रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा करतील तेव्हा सर्व देवी-देवता...'; काय म्हणाले गृहमंत्री ?

Ram Mandir Inaugration: अयोध्येत रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा करण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली
Ram Mandir Inaugration
Ram Mandir InaugrationSarkarnama

Delhi News: अयोध्येत रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा करण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. 22 जानेवारीला राम मंदिरात भव्य सोहळ्यात रामलल्ला विराजमान होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यावेळी मुख्य यजमान असतील. दि.16 जानेवारीला सात दिवसांच्या अनुष्ठानाने याची सुरुवात होईल. राम मंदिर उभारले जाणे हे एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नाही, असे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. हा एक अत्यंत अद्भूत आणि ऐतिहासिक क्षण असेल, असेही सांगितले जाते. याचदरम्यान, केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सर्व देव-देवताही राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थितीत राहतील, असे म्हटले आहे.

'जेव्हा पंतप्रधान मोदी हे राम मंदिराचे उद्घाटन करतील त्यादिवशी राम मंदिरासाठी बलिदान दिलेले लोकं या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी इथे उपस्थित राहतील. त्याचबरोबर सर्व देव-देवताही त्यादिवशी अयोध्येत येतील', असे नित्यानंद राय म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ram Mandir Inaugration
Ayodhya Ram Mandir: 'प्रभू श्रीराम हिंदूंचेच नाही तर मुस्लिमांचेही दैवत'; भाजपच्या सत्यपाल सिंहांची प्रतिक्रिया

दि.22 जानेवारीच्या सोहळ्याला उपस्थितीत राहण्याची सर्वांची इच्छा आहे. त्यासाठी सर्वांना अयोध्येला यायचे आहे. परंतु, माझी सर्व रामभक्तांना विनंती आहे की, त्यांनी आताच अयोध्येला न येता आपल्या सोयीनुसार नंतर दर्शनासाठी यावे. 22 तारखेला अयोध्येला येऊ नका, असे आवाहन राय यांनी केले.

राम मंदिराच्या उद्घाटनानंतर लाखोंच्या संख्येने लोकं शहरात येतील. यामुळे ते 22 तारखेला आले किंवा इतर दिवशी आले याचा काही फरक पडणार नाही. पण एवढे मात्र निश्चित आहे की, लाखोंच्या संख्येने लोक येतील. त्यामुळे अयोध्येतील लोकांना माझी विनंती आहे की, त्यांनी शहर स्वच्छ ठेवण्यास प्रशासनाला मदत करावी.

संपूर्ण देशभरात या सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. घरोघरी जाऊन अक्षता देण्यात येत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात नागरिकांनी 22 जानेवारीला दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास पंतप्रधान मोदींशिवाय सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, अधीर रंजन चौधरी यांच्यासमवेत अनेक नेत्यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे.

(Edited By Ganesh Thombare)

Ram Mandir Inaugration
Trinamool Congress : पंजाब अन् पश्चिम बंगालच्या चित्ररथाच्या मार्गात केंद्राचा खोडा; आप, तृणमूल काँग्रेसला झटका

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com