Ram Mandir controversy and government response: अयोध्येतील राम मंदिरातील देणगी आणि चढाव्यातील गैरव्यवहार प्रकरणाने आता मोठे वळण घेतले आहे. या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींविरुद्ध कठोर कारवाईची तयारी सुरू असून, चोरी झालेला प्रत्येक रुपया आणि मंदिरातील मौल्यवान संपत्ती परत मिळवण्यासाठी उत्तर प्रदेश सरकार आणि विशेष तपास पथक (SIT) आक्रमक भूमिका घेत असल्याचे समोर आले आहे. केवळ रोख रक्कमच नव्हे तर आरोपींच्या मालमत्ता, सोने-चांदी आणि इतर संपत्तीद्वारेही नुकसानभरपाई वसूल करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
राम मंदिरातील चढावा आणि देणगीतील गैरव्यवहार प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे मंदिर ट्रस्टमधील काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, त्यांची चौकशी करण्यात आली आहे. तपासाची व्याप्ती वाढत असल्याने SIT चा कार्यकाळ आणखी 15 दिवसांनी वाढवण्यात आला आहे.
तपास यंत्रणांकडून आरोपींच्या आर्थिक व्यवहारांचा आणि मालमत्तांचा सखोल अभ्यास सुरू आहे. चोरीच्या पैशातून कोणत्या मालमत्ता उभारण्यात आल्या, त्याची माहिती गोळा केली जात आहे. याशिवाय तपासादरम्यान आणखी 5 गणनाकर्मचाऱ्यांची भूमिका संशयास्पद आढळल्याची माहिती समोर आली असून त्यांच्याकडूनही चौकशी केली जात आहे. पुरावे हाती आल्यानंतर आणखी अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार,..
चोरीची रक्कम वसूल करण्यासाठी आता नवीन कायदेशीर तरतुदींचा वापर केला जाणार आहे. गुन्ह्यातून मिळवलेल्या संपत्तीतून नुकसानभरपाई घेण्याची प्रक्रिया राबवली जाईल. त्यामुळे आरोपींनी बेकायदेशीर मार्गाने मिळवलेल्या मालमत्तांवरही कारवाई होऊ शकते.
तपास पथक मंदिरातील देणगीत आलेल्या सोने-चांदीचा मागोवा घेत आहे. चोरीचा माल कुठे लपवण्यात आला किंवा विक्री करण्यात आली का, याचाही शोध घेतला जात आहे. यासाठी विविध ठिकाणी छापेमारी सुरू असून पुरावे गोळा करण्याचे काम वेगाने सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणात सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि काही कर्मचाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी केली जात आहे. आतापर्यंत 50 हून अधिक व्यक्तींची चौकशी करण्यात आली आहे. अनेक वर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या काही कर्मचाऱ्यांमुळे गैरव्यवहाराला खतपाणी मिळाले का, याचाही तपास सुरू आहे. त्यामुळे राम मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याचे पडसाद आता अधिक व्यापक स्वरूपात उमटताना दिसत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.