Ketan Agrawal murder case : केतन अग्रवाल खून प्रकरणात मोठा ट्विस्ट; संशयाची सुई फिरली, 'हुडी मॅन'चे गूढ वाढले, हत्याकांडातील 'ती' तिसरी व्यक्ती कोण?

Hoodie man mystery in Ketan Agrawal murder case : केतन अग्रवाल हत्याप्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. 'हुडी मॅन' आणि एका संशयित तिसऱ्या व्यक्तीच्या भूमिकेचा तपास सुरू असून प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
Accused Siya Goyal and Chetan Chaudhary
Accused Siya Goyal and Chetan Chaudhary Sarkarnama
Published on
Updated on

केतन अग्रवाल हत्याकांडाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे या प्रकरणातील धक्कादायक तपशील समोर येत आहेत. आधीच प्रेमसंबंध, कटकारस्थान आणि नियोजनबद्ध हत्येच्या आरोपांमुळे चर्चेत असलेल्या या प्रकरणात आता एका रहस्यमय ‘हुडी मॅन’मुळे नव्याने प्रश्न निर्माण झाले आहेत. पोलिसांच्या तपासात मिळालेल्या माहितीमुळे संशयाची दिशा बदलताना दिसत असून, या संपूर्ण कटात आणखी एखाद्या व्यक्तीचा सहभाग होता का, याचीही चौकशी सुरू झाली आहे.

18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवाल याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. तपासादरम्यान हा अपघात नसून नियोजनपूर्वक घडवून आणलेली हत्या असल्याचा संशय बळावला. या प्रकरणात केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली असून दोघांची सध्या कसून चौकशी सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळी नेऊन सीन रिक्रिएशनही केले असून विविध डिजिटल पुराव्यांची तपासणी सुरू आहे.

Accused Siya Goyal and Chetan Chaudhary
Ketan Agarwal Murder: केतन अगरवालला लोहगडावरुन नेमकं कोणी ढकललं? पोलिसांना मिळेना पुरावा; कोर्टाकडं केली महत्वाची मागणी

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, केतनला संपवण्याचा कट अनेक महिन्यांपासून आखला जात होता. यापूर्वीही काही प्रयत्न झाल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. अखेर 18 जून रोजी केतनला लोहगडावर नेण्यात आले आणि तेथे त्याला कड्यावरून ढकलण्यात आल्याचा आरोप आहे.

दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजमधील ‘हुडी मॅन’ हा तपासाचा महत्त्वाचा धागा ठरला आहे. गड परिसरात हुडी परिधान करून फिरणारा एक तरुण अवघ्या काही मिनिटांसाठी दिसून आला होता. पोलिसांच्या तपासानंतर हा व्यक्ती चेतन चौधरी असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र तपासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. घरातून बाहेर पडताना चेतनने वेगळे कपडे घातले होते, तर गडावर तो हुडीमध्ये दिसला. त्यानंतर परतताना त्याचा पोशाख पुन्हा बदललेला होता.

Accused Siya Goyal and Chetan Chaudhary
TET Exam Update : TET पेपरफुटीनंतर परीक्षार्थीसाठी आणखी एक मोठी बातमी : पुर्नपरीक्षा सप्टेंबरपर्यंत लांबण्याची शक्यता, कारणही समोर

यामुळे गुन्ह्यानंतर ओळख टाळण्यासाठी कपडे बदलण्यात आले का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. हे कपडे नेमके कुठे बदलले गेले, त्यांची विल्हेवाट कशी लावली गेली आणि या प्रक्रियेत आणखी कोणी मदत केली का, याचा शोध पोलीस घेत आहेत. त्यामुळे या प्रकरणात तिसऱ्या व्यक्तीच्या सहभागाची शक्यताही तपासली जात आहे.

सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पोलीस कोठडी 3 जुलै रोजी संपत असून त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. तपास यंत्रणांचे लक्ष आता मोबाईल डेटा, डिलिट केलेले चॅट्स आणि इतर डिजिटल पुराव्यांवर केंद्रित झाले आहे. या पुराव्यांतून हत्येच्या कटामागील संपूर्ण सत्य उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com