Ramdas Aathavle: रामदास आठवले यांना जे अद्याप महाराष्ट्रात जमलं नाही, ते त्यांनी काही महिन्यापूर्वी नागालँडमध्ये करून दाखवलं. भाजप आणि स्थानिक पक्षांशी युती न करता नागालँडमध्ये आठवलेंचे दोन आमदार जिंकले. आगामी काळात नागालँडमध्ये आमचेच सरकार येईल, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला आहे. (RPI Ramdas Aathavle latest news)
"इंडिया आघाडीसोबत नितीश कुमार हे गेले होते, पण शब्द दिल्यानुसार त्यांना पुन्हा सोबत घेतलं. भाजपवाले पक्ष संपवतात असा मला अनुभव नाही. माझा पक्ष वाढतोय… नागालॅँडमध्ये आमचे खासदार निवडून आले आहेत. पुढच्या काळात आमचे सरकार येईल. माझे सगळ्यांशी संबंध चांगले आहेत. फक्त शरद पवारांशी नाहीत," असे ते म्हणाले.
रामदास आठवले म्हणाले, "माझे उद्धव ठाकरेंसोबतचे संबंध चांगले झाले, पण एकनाथ शिंदे यांचे तेवढे राहिले नाहीत. उद्धव ठाकरे म्हणतात, मला भाजपने शब्द दिला आणि तो पाळला नाही. भाजपवाले असाच शब्द देत नाहीत.. शब्द दिला तर ते पाळतात,"
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढवण्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख रामदास आठवले हे इच्छुक आहेत. "आपण याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भेटलो आहे, असे आठवले म्हणाले.
जातीमुक्त समाज रचना झाली पाहिजे… अखंड भारत राहिला पाहिजे, अशी भूमिका डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडली. गाडगेबाबा आणि बाबासाहेबांचे चांगले संबंध होते. समाज म्हणून आपण एकच आहोत… आपला देश एक म्हणजे आपण एक आरक्षण पाहिजे असेल तर घ्या. मिळालं असेल तर शांत बसा, असे आठवले यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 400 पार धोरणावर या वेळी आठवलेंनी भाष्य केले. मागच्या 5 वर्षांप्रमाणे पुढच्या 5 वर्षांतदेखील विकासाची कामं करता येतील. महाराष्ट्रात 45 जागा मिळण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
मी गावातून आलोय. सगळा मराठा समाज श्रीमंत नाही अनेकांना मुलांचं शिक्षण घेता येत नाही, त्यांना नोकरी मिळत नाही. आमच्या आरक्षणाला कोणी हात लावायला जाऊ नका. आम्ही ते होऊ देणार नाही, असे त्यांनी सांगितले. आम्हाला 15 टक्के आरक्षण आहे. आता 2024 ची लोकसंख्या अधिक आहे… त्यामुळे आरक्षण वाढविण्याची आमची मागणी आहे. टक्केवारीनुसार आरक्षण देण्याची आमची मागणी आहे, असे ते म्हणाले.
दक्षिण मध्य मध्ये पूर्वी मी निवडून आलोय… आता दोन वेळा राहुल शेवाळे तिथून निवडून आलेत. तिसऱ्यांदाही ते निवडून येतील, आता मोदींच्या शपथविधीत राहुल शेवाळे आणि माझाही शपथविधी होईल, असा विश्वास, त्यांनी व्यक्त केला.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.