केरळमधील सत्ताधारी डाव्या लोकशाही आघाडीचा घटक पक्ष असलेले, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे (मार्क्सवादी) नेते पी. व्ही. सत्यनाथन (वय ६०) यांची हत्या झाल्याची माहिती समोर येत आहे. CPM leader PV Sathyanathan hacked to death koyilandi
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
एका मंदिरातील धार्मिक उत्सवात ते सहभागी होण्यासाठी जात असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. माकपचे ते जिल्हा सचिव होते. कोझिकोड जिल्ह्यात कोयळंदीजवळील एका मंदिराच्या आवारात गुरुवारी रात्री ही घटना घडली. त्यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज माकपने बंद पुकारला आहे.
एका सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन कोझिकोडच्या वैद्यकीय महाविद्यालय करण्यात आले.
पी. व्ही. सत्यनाथन यांच्या निधनानंतर त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. हल्लेखोरांना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. त्यांच्या हत्याप्रकरणी अभिलाष (वय ३५) याला पोलिसांनी अटक केली आहे. सत्यनाथन यांच्या मानेवर एकाच जागी चार वार झाले होते.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.