Amit Shah, Ramdas Athawale Sarkarnama
देश

Ramdas Athawale : डॉ. आंबेडकरांबाबतच्या 'त्या' वक्तव्याप्रकरणी आठवलेंकडून अमित शहांची पाठराखण तर काँग्रेसवर हल्लाबोल

Amit Shah Statement About Dr. Babasaheb Ambedkar : लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांत संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संविधानावर चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे.

Jagdish Patil

Navi Delhi News, 19 Dec : लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांत संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संविधानावर चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत भाषण करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे.

या मुद्द्यावरून देशभरात काँग्रेसकडून (Congress) आंदोलन केलं जात आहे. तर संसदेतही विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत 'जय भीम'च्या घोषणा दिल्या आणि संसदेच्या आवारातही जोरदार निदर्शने केली. तसेच काँग्रेसकडून गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

अशातच आता अमित शहांच्या (Amit Shah) डॉ. आंबेडकरबद्दलच्या विधानावर आंबेडकरी नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया देत शहांची पाठराखण केली आहे. अमित शाह यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंदर्भातील वक्तव्यावर बोलताना रामदास आठवले यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.

ते म्हणाले, "मला वाटतं काँग्रेसला यावर कोणतीही टिप्पणी करण्याचा अधिकार नाही. अमित शाह हे राज्यसभेत संविधानाबाबत सांगत होते. काँग्रेस पक्षाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दोनदा पराभव हे सांगण्याचा त्यांच्या बोलण्याचा अर्थ होता. शिवाय काँग्रेसमुळेच डॉ. आंबेडकरांना कायदामंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता, हे ते सांगण्याचा प्रयत्न करत होते.

काँग्रेसचं सरकार असताना आंबेडकरांची फोटो देखील लावली नव्हता, त्यामुळे काँग्रेसचे लोक हे बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणारे असून त्यांसतत चा अपमान करण्याचं काम काँग्रेसने केला आहे, हे सांगण्याचा त्यांचा हेतू होता. अमित शाह यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत खूप आदर असून त्यांच्या भाषणात कुठेही आंबेडकरांचा अपमान करण्याचा हेतू नव्हता, असं आठवले (Ramdas Athawale) म्हणाले.

शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच आंबेडकरांबद्दल चांगलं बोलतात. तर आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला उत्तर देण्याचा प्रयत्न शाह यांनी केला होता. यामध्ये आंबेडकरांच्या अपमानाचा प्रश्नच येत नाही, मात्र, काँग्रेस जाणूनबुजून काही ना काही विषय काढून सभागृहाचं काम रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचंही आठवलेंनी म्हटलं आहे.

शहांचं स्पष्टीकरण

दरम्यान, या सर्व प्रकरणावर अमित शाह यांनी देखील स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले, "जेव्हा संसदेत जे काही मांडलं जातं त्यात तथ्य हवं. पण काँग्रेसने वास्तवाची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला, ही बाब निषेधार्ह असून त्याचा मी तीव्र निषेध करतो. काँग्रेस हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोध करणारा पक्ष आहे. काँग्रेस आरक्षण विरोधी आहे. काँग्रेस सावकरविरोधी आहे. या सर्वांचे उत्तर काँग्रेसकडे नसल्यामुळे आता काँग्रेस संभ्रम निर्माण करत आहे.

माझे पूर्ण वक्तव्य राज्यसभेच्या रेकॉर्डवर आहे. मी किंवा माझा पक्ष स्वप्नातही बाबासाहेबांचा अपमान करु शकत नाही. ज्यांनी आयुष्यभर बाबासाहेबांचा अपमान केला. त्यांच्या सिद्धांतांचा विरोध केला आहे. त्यांना भारतरत्न दिला नाही. ते बाबासाहेबांच्या नावावर आता संभ्रम निर्माण करत असून ते आता आपल्या जुन्या नितीवर आले असून त्यांनी माझे वक्तव्याचे विपर्यास केला या काँग्रेसच्या प्रयत्नाचा मी निषेध करतो. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT