Ranjan Gogoi sarkarnama
देश

`बाबरी`चा निकाल लावून सर्व न्यायाधीशांची 5 स्टारमध्ये वाईन पार्टी!

'कोर्टनंबर १च्या बाहेर न्यायमूर्तींच्या गॅलरीमध्ये एक फोटो सेशनचे आयोजन केले होते. मग संध्याकाळी मी सहकारी न्यायमूर्तींना डिनरसाठी ताज मानसिंह हॉटेलमध्ये घेऊन गेलो,’'

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : माजी न्यायाधीश आणि सध्याचे राज्यसभा खासदार रंजन गोगाई (Ranjan Gogoi) यांचे ''जस्टिस फॉर द जज: एन ऑटोबायोग्राफी'' हे आत्मचरित्र नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. या आत्मचरित्रात त्यांनी अनेक घटनांबाबतचा खुलासा केला आहे. रंजन गोगोई यांच्या कारकिर्दीमधील अनेक प्रमुख घटनांपैकी एक राम जन्मभूमीचे (Ayodhya verdict justice) प्रकरण आहे.

गोगाई यांच्याकडे वादग्रस्त व्यक्तीमत्व म्हणून पाहिलं जाते. या आत्मचरित्रात त्यांनी चार वरिष्ठ न्यायमूर्तींनी घेतलेली पत्रकार परिषद, लैंगिक छळाचे आरोप, त्यांनी घेतलेले निर्णय, रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाचा निकाल आदी खटल्याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ९ नोव्हेंबर २०१९ रोजी या घटल्याचा निकाल लागला होता. त्यानंतर गोगाई यांनी आपल्या सहकारी न्यायाधीशासोबत केलेल्या डिनर विषय सविस्तर सांगितले आहे.

१७ नोव्हेंबर २०१९ रोजी सेवानिवृत्त झालेल्या रंजन गोगोई यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाला बोबडे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, माजी कायदा मंत्री रविशंकर प्रसाद आणि इतरही उपस्थित होते. तत्कालीन सरन्यायाधीश गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील अयोध्या प्रकरणाचा निकाल पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने दिला होता. यात रंजन गोगोई यांच्यासह न्यायमूर्ती एसए बोबडे आणि न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड, अशोक भूषण आणि एस अब्दुल नजीर यांचा समावेश होता. या निकालानंतर त्यांनी त्याचे सेलिब्रेशन कसे केले होते, याचा उल्लेख गोगाई यांनी या आत्मचरित्रात केला आहे.

''जस्टिस फॉर द जज: एन ऑटोबायोग्राफी''मध्ये रंजन गोगाई म्हणतात, ''राम जन्मभूमीचे प्रकरणाच्या निकालानंतर महासचिव यांनी अशोक चक्रच्या खाली कोर्टनंबर १च्या बाहेर न्यायमूर्तींच्या गॅलरीमध्ये एक फोटो सेशनचे आयोजन केले होते. मग संध्याकाळी मी सहकारी न्यायमूर्तींना डिनरसाठी ताज मानसिंह हॉटेलमध्ये घेऊन गेलो. आम्ही चायनीज जेवण खाल्ले आणि त्या हॉटेलमध्ये असलेल्या सर्वात चांगल्या वाईनची एक बॉटल घेतली.’

यावेळी त्यांनी रामजन्मभूमी प्रकरणाच्या निर्णयात अडथळा आणणाऱ्या व्यक्तीचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, १६ ऑक्टोबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता. मात्र, त्या दिवशी एका व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात प्रवेश करून निर्णयात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला.

 रंजन गोगोई यांनीही सर्वोच्च न्यायालयात हजेरी लावणारा एक वकील न्यायव्यवस्थेच्या कामकाजात अडथळा आणत असल्याचा खुलासा केला. माजी न्यायमूर्ती गोगोई यांच्या आदेशानंतर त्या व्यक्तीला न्यायालयात हजर राहण्यास मनाई करण्यात आली होती. न्यायमूर्ती गोगोई म्हणाले की, त्या व्यक्तीचा उद्देश केवळ सुनावणीत अडथळा आणण्याचा होता हे लक्षात आल्याने हे करावे लागले.

रंजन गोगोई म्हणाले, ''जर तो माणूस न्यायालयात दाखल झाला असता, तर त्याचा परिणाम न्यायालयाच्या कामकाजावर झाला असता. न्यायालयाला या प्रकरणाला स्थगिती द्यावी लागली असती. मी त्याची ओळख कधीच उघड करणार नाही." राज्यसभा सदस्याचा प्रस्तावाबाबत ते म्हणाले, ''मी कोणत्याही पक्षात नाही, मला राष्ट्रपतींनी उमेदवारी दिली आहे,''

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT