Raosaheb Danave - Ajit Pawar
Raosaheb Danave - Ajit Pawar Sarkarnama
देश

दानवेंनी हिशोब केला अन् अजितदादांना समजवला; जोडीला इशाराही दिला...

सरकारनामा ब्युरो

मुंबई : वस्तू व सेवा कर कायद्याअंतर्गत राज्याला केंद्र सरकारकडून मिळणारी जीएसटीची (GST) काही रक्‍कम तीन वर्षांपासून थकली आहे. २०१९-२० ते २०२१-२२ या तीन वर्षांतील जवळपास ३० हजार कोटी रुपयांची रक्कम जीएसटी भरपाई केंद्राकडून मिळालेली नाही. आज पुण्यात कोरोना आढावा बैठकीनंतर बोलतानाही उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या रकमेचा उल्लेख केला. त्यामुळे ही रक्‍कम तत्काळ मिळावी आणि जीएसटी परताव्याची मुदत पाच वर्षांनी वाढवावी, असे पत्र राज्य सरकारने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांना लिहिले आहे. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पामध्येच त्याचा निर्णय व्हावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.

याच बाबत आज केंद्रीय रेल्वे आणि कोळसा राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danave) यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, हिशोब जर काढला तर राज्याकडे आमचे म्हणजे केवळ कोळसा मंत्रालयाचे ३००० कोटी थकित आहेत. मी कोळसा मंत्री आहे. आता तुमच्याकडे कोळसा नाही. पण तुम्ही पैसे दिले नाहीत, म्हणून आम्ही कोळसा थांबवला नाही. त्यामुळे केंद्राने हिशोब जर काढला तर राज्याची पंचाईत होऊन जाईल, असा इशारा रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारला दिला. तसेच सर्व राज्यांना जीएसटीचे पैसे समप्रमाणे दिले जातात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वाईन विक्रीच्या निर्णयावर जोरदार टीका.

रावसाहेब दानवे यांनी यावेळी बोलताना राज्य सरकारच्या वाईन विक्रीच्या धोरणावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, राज्य सरकारमध्ये काय चाललं हे, ना सरकारला कळतं ना राज्यातील जनतेला कळतं. आमच्या काळात चंद्रपूरसारख्या जिल्ह्यात दारुबंदी केली होती. या सरकारने ती दारुबंदी उठवली. आता केवळ बंदीच उठवून हे राज्य सरकार थांबलेले नाही. आता छोट्या दुकानात वाईन विकायला या सरकारने परवानगी दिलेली आहे. राज्य सरकारला जर उत्पन्न वाढवायचे असेल तर त्यासाठी अनेक मार्ग आहेत. त्यासाठी हा मार्ग असू शकत नाही, असेही खडे बोल त्यांनी राज्य सरकारला सुनावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT