माघार घेतलेले राणे भाजपच्या पराभवासाठी पुन्हा मैदानात...

Goa Assembly election : सुनेच्या विरोधात प्रचार करण्याचे काँग्रेस उमेदवाराला वचन
BJP and Congress
BJP and Congress Sarkarnama
Published on
Updated on

पणजी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे (pratapsingh rane) पुन्हा एकदा मैदानात (Goa Assembly election) उतरले आहेत. यापुर्वी त्यांनी पर्ये मतदारसंघात निवडणुकीतून ऐनवेळी माघार घेतली होती. मात्र 'गोमन्तक'ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये ते म्हणाले, राजकारणातून कोण निवृत्त होत नसतो. निवडणुकीतून माघार घेतली असली तरी आपण काँग्रेसच्या तत्त्वांशी बांधील आहे आणि काँग्रेस प्रचाराची धुरा वाहणार आहे. तसेच पर्ये मधून देखील आपण आपल्या सुनेविरुद्ध काँग्रेसचे उमेदवार रणजीत राणे यांचाच प्रचार करणार आहे. प्रतापसिंग राणे यांची सून दिव्या राणे यांना पर्ये मतदारसंघात भाजपने (BJP) यापूर्वीच उमेदवारी जाहीर केली आहे. (Pratap Singh Rane Goa Election)

प्रतापसिंग राणे म्हणाले, मी कॉंग्रेस पक्षांच्या (Congress) तत्त्वांशी बांधील आहे. कॉंग्रेस पक्ष सर्वसमावेशक राहिला आहे. त्या पक्षाने जात-धर्मावरून कधी भेदभाव केला नाही आणि मने तोडण्याचे कृत्यही कधी केले नाही. मी मुख्यमंत्री असताना इंदिरा गांधींपासून राहुल गांधीपर्यंत सर्वांसोबत काम केले आहे. गांधी कुटुंबातील तरुण पिढीशीही माझा संपर्क आला आहे. ही तरुण पिढी अजूनही काँग्रेस नितीमूल्यांना धरून आहे.

BJP and Congress
"मी पुन्हा तालिका अध्यक्षांच्या खुर्चीवर बसणार नाही" ; भास्कर जाधवांची मोठी घोषणा

या पार्श्वभूमीवर राणे कुटुंबाची दुसरी पिढी भाजपसोबत कशी गेली? या प्रश्नावर उत्तर देताना राणे म्हणाले, मी कोणावर कधीही बंधन आणले नाही आणि पुत्रालाही कधी त्याच्या राजकीय निर्णयांपासून रोखले नाही. विश्वजित राणे यांच्यावर निर्णय लादण्याची माझी कधीही भूमिका राहिली नाही. तो स्वतःचे निर्णय घ्यायला समर्थ आहे. परंतु माझ्या निर्णयांवरही मी कुणाला हस्तक्षेप करू देणार नाही. काँग्रेस पक्षाशी मी यापुढेही निगडीत राहीन. एवढेच नव्हे, तर मी प्रचारात देखील जरूर सहभागी होईन. निवडणुकीच्या (Election) राजकारणाव्यतिरिक्तही राजकारण करण्यासारखी अनेक कामे असतात. शिवाय संसदीय राजकारणही मला खुले आहे.

BJP and Congress
दारु आणि वाईन यामध्ये जमीन अस्मानचा फरक; अजित पवार

विरोधक कुणीही असो...

काल प्रतापसिंग राणे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पर्येचे काँग्रेस उमेदवार रणजीत राणे देखील आले होते. रणजीत यांनी यावेळी आपल्या कार्यकर्त्यांसह प्रतापसिंग राणेंना शुभेच्छा देऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. तेव्हा आपण पर्ये मतदारसंघात रणजीत यांना पाठिंबा देऊ आणि त्यांच्या प्रचारातही भाग घेऊ, असे वचन प्रतापसिंग राणे यांनी दिले. ते म्हणाले, रणजीत हे या मतदारसंघाचे पहिले आमदार जयसिंगराव राणे यांचे सुपुत्र आहेत आणि मीच त्यांचे नाव काँग्रेसला सुचवले, आहे. त्यामुळे रणजीत यांच्या प्रचारात मी भाग घेईन. त्यांच्या विरोधात कोणीही असले तरी मला त्याची पर्वा नाही, असे प्रतापसिंग राणे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com