New Delhi : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील विधानाचे पडसाद आता 'एनडीए'मध्येही उमटू लागले आहेत. मागील आठवड्यात एनडीएतील एका पक्षाच्या प्रवक्त्यानेच शहांवर टीका केली होती. त्यानंतर संबंधित पक्षाचे प्रमुख असलेल्या केंद्रीय मंत्र्यांनी पक्षाच्या सर्व प्रवक्त्यांना हटवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रीय लोकदलाचे प्रमुख व केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांनी सर्व प्रवक्त्यांना हटवले आहे. पक्षाचे प्रवक्ते कमल गौतम यांनी मागील आठवड्यात शुक्रवारी अमित शाह यांनी त्यांच्या विधानावर माफी मागायला हवी, असे म्हटले होते. त्यांचे वक्तव्य योग्य नसल्याचेही ते म्हणाले होते. त्यावरून 'एनडीए'मध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
'एनडीए'तील मित्रपक्षाच्या प्रवक्त्यानेच शहांवर निशाणा साधल्यानंतर जयंत चौधरी यांच्या पक्षाने मोठा निर्णय घेतला. पक्षाचे महासचिव त्रिलोक त्यागी यांनी सर्व राष्ट्रीय व राज्य प्रवक्त्यांना तातडीने हटवण्यात आल्याची माहिती दिली. काही प्रवक्ते सक्रीय नसल्याने आणि काही प्रवक्ते अति उत्साही असल्याने हटवण्यात आले आहेत. काही दिवसांनंतर नव्या प्रवक्त्यांची नियुक्ती केली जाईल, असे त्यागींनी सांगितले.
राष्ट्रीय लोकदलाचे उत्तर प्रदेशचे प्रमुख रामशिष राय यांनी मात्र कमल गौतम यांच्या विधानामुळे प्रवक्त्यांना हटवण्यात आल्याचे मान्य केले. गौतम यांच्या विधानावर जयंत चौधरी नाराज आहेत का, या प्रश्नावर राय यांनी उत्तर देण्याचे टाळले. पक्षातील दुसऱ्या नेत्याने गौतम यांच्या वक्तव्यामुळे पक्षचे नेतृत्व नाराज झाले होते. एनडीएला ते वक्तव्य अडचणीचे ठरले होते. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे सांगितले.
अमित शाह यांचे बाबासाहेबांविषयीचे विधान योग्य नव्हते. तुम्ही गृहमंत्री आहात. सध्या कायदा-सुव्यवस्था ठीक नाही. त्यामुळे त्यांनी माफी मागावी, अशी आमची मागणी आहे. कारण त्यांचे विधान गंभीर आहे. हे केवळ भारतातच नाही तर जगभरातील त्यांच्या अनुयायांपर्यंत हे पोहचणार असल्याचे गौतम म्हणाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.