ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनामुळे (Ratan Tata Passed Away) जगभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्या अनेक आठवणींनी उजाळा मिळत आहे. रतन टाटा यांनी जपलेली मुल्ये, आदर्श याबाबत उद्योगविश्वातील त्यांचे सहकारी, उद्योपती यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
यशस्वी उद्योजक असलेल्या रतन टाटांचे व्यक्तिगत आयुष्य (Ratan Tata Personal Life) काहीशे रहस्यमय होते. एका मुलाखतीत त्यांनी आपल्या मनातील हळव्या भावना उलगडल्या होत्या. त्यांच्या 'प्रेमाची गोष्ट' त्यांनी शेअर केली होती.
सिमी ग्रेवाल यांना 1997 मध्ये दिलेल्या मुलाखती रतन टाटा यांनी प्रथमच आपल्या 'प्रेमाची गोष्ट' सांगितली होती. रतन टाटा यांचे आई-वडील विभक्त झाले त्यावेळी त्यांचे ते 10 वर्षांचे होते. त्यांचा सांभाळ त्यांच्या आजीनं केला.
1960 च्या दशकात शिक्षणासाठी ते अमेरिकेला गेले होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी तेथेच नोकरी करणं पसंद केले. नोकरी करीत असताना त्यांचा एका युवतीवर जीव जडला. प्रेमविवाह करण्याची दोघांची इच्छा होती. दरम्यान भारत-चीन युद्ध सुरु झाले. त्यावेळी त्यांच्या आजीनं त्यांना परत भारतात बोलवले. त्यांचा लहान भाऊही आजीकडे होता. आजींच्या शब्दाला ते नकार देऊ शकले नाहीत. (Ratan Tata incomplete Love Story)
एका प्रेमाचा अंत...
आई-वडीलांचे छत्र हरवल्यानंतर आजी नवाजबाई यांनी त्यांचा सांभाळ केला होता. अनेक वर्ष ते आजीपासून दूर होते. आजीवर त्यांचे जीवापाड प्रेम होते. चीन-भारत युद्ध सुरु असतानाच ते त्यांना भारतात परत यावे लागले. ती तरुणी मात्र भारतात आली नाही. भारत-चीन युद्ध सुरु असताना तिला भारतात पाठवणे तिच्या आई-वडीलांना योग्य वाटले नाही. तिच्या वडीलांचा लग्नाला विरोध असल्यामुळे या प्रेमाचा अंत झाला. Let's know this tycoon's love life!
रतन टाटांच्या निधनानंतर जगभरातून शोकसंदेश सोशल मीडियावर पोस्ट होत आहेत. देशासाठी युवकांसाठी आदर्श व्यक्तिमत्व अशी रतन टाटा यांची ओळख होती. त्यांचा आदर्श कायम स्मरणात राहिल, अशा भावना युवा उद्योजकांनी व्यक्त केल्या आहेत.
राष्ट्रपती दौपद्री मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, टाटा समुहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेअर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहीली आहे. हरियाणा आणि महाराष्ट्र एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येत आहे. सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
रतन टाटा एक दूरदर्शी उद्योगपती होते. दयाळू व्यक्तीमत्त्व आणि विलक्षण व्यक्ती होते. त्यांनी भारतामधील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित व्यावसायिक घराण्यांना नेतृत्व प्रदान केलं. त्यांच्या निधनाने अत्यंत दु:ख झाले आहेत. ओम शांती!असे टि्वट् मोदींनी केले आहे.
नरिमन पॉइंट येथील एनसीपीए लॉन्स येथे रतन टाटा यांच्या पार्थिवाचे अत्यंदर्शन घेण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी गर्दी केली आहे. दुपारी 4 वाजता त्यांचे पार्थिव वरळी स्मशानभूमी येथे नेण्यात येणार आहे. एनसीपीए लॉन्स ते वरळी स्मशानभूमी अशी अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. या अंत्ययात्रेत अनेक दिग्गज सहभागी होणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.