Ratan Tata death LIVE Updates: चाहत्यांना धन्यवाद! रतन टाटा यांची अखेरची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल......

Ratan Tata Demise Last Social Media Post: नरिमन पॉइंट येथील एनसीपीए लॉन्स येथे आज सकाळी 10 ते दुपारी 04 या वेळेत रतन टाटा यांच्या पार्थिवाचे अत्यंदर्शन घेता येणार आहे. दुपारी 4 वाजता त्यांचे पार्थिव वरळी स्मशानभूमी येथे नेण्यात येणार आहे.
Ratan Tata
Ratan TataSarkarnama
Published on
Updated on

देशाचे उद्योगपती, टाटा समुहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा (Ratan Tata) यांच्या निधनाने जगभर शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांनी सोशल मीडियावर केलेली अखेरची पोस्ट व्हायरल होत आहे. आपल्या चाहत्यांना धन्यवाद देत रतन टाटा यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केलं होते. या पोस्ट सोबत त्यांनी एक पत्र लिहिलं होते.

आपल्या प्रकृतीविषयी पसरलेल्या अफवा बाबत त्यांनी लिहिलं होते. आपल्या प्रकृतीबाबत प्रसिद्ध झालेले वृत्त खोटे असून मी माझ्या प्रकृतीची नियमीत तपासणी करण्यासाठी रुग्णालयात दाखल झालो आहे. काही वैद्यकीय तपासण्या करीत आहे, असे त्यांनी म्हटलं होते.

रतन टाटा अनेक दिवसापासून आजारी होते. त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅडी रुग्णालयात उपचार सुरु होते. काल (बुधवारी) उपचारा दरम्यान त्यांनी प्राणज्योत मालवली. ते ८६ वर्षांचे होते.

त्यांच्या निधनानंतर जगभरातून शोकसंदेश सोशल मीडियावर पोस्ट होत आहेत. राष्ट्रपती दौपद्री मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, टाटा समुहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेअर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहीली आहे. हरियाणा आणि महाराष्ट्र एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येत आहे. सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

Ratan Tata
Ratan Tata : सर्वात दानशूर व्यक्तीमत्त्व; तरीही एवढी संपत्ती सोडून गेलेत रतन टाटा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्ट करीत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. रतन टाटा एक दूरदर्शी उद्योगपती होते. दयाळू व्यक्तीमत्त्व आणि विलक्षण व्यक्ती होते. त्यांनी भारतामधील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित व्यावसायिक घराण्यांना नेतृत्व प्रदान केलं. त्यांच्या निधनाने अत्यंत दु:ख झाले आहेत. ओम शांती!असे टि्वट् मोदींनी केले आहे.

रतन टाटा यांच्या निधनाने राज्यात आज एक दिवसाचा शासकीय दुखवटा पाळण्यात येत आहे, याबाबतची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतील, तसेच मनोरंजन किंवा करमणुकीचे कोणतेही कार्यक्रम होणार नाहीत. टाटा यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

नरिमन पॉइंट येथील एनसीपीए लॉन्स येथे आज सकाळी 10 ते दुपारी 04 या वेळेत रतन टाटा यांच्या पार्थिवाचे अत्यंदर्शन घेता येणार आहे. दुपारी 4 वाजता त्यांचे पार्थिव वरळी स्मशानभूमी येथे नेण्यात येणार आहे. एनसीपीए लॉन्स ते वरळी स्मशानभूमी अशी अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. या अंत्ययात्रेत अनेक दिग्गज सहभागी होणार आहेत. देशासाठी युवकांसाठी आदर्श व्यक्तिमत्व अशी रतन टाटा यांची ओळख होती. त्यांचा आदर्श कायम स्मरणात राहिल, अशा भावना युवा उद्योजकांनी व्यक्त केल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com