Sachin Pilot on RBI Repo Rate Hike Sarkarnama
देश

Sachin Pilot on RBI Repo Rate Hike : रेपो दरवाढीवरून सचिन पायलटांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ‘मध्यमवर्गाच्या खिशावर डाका’

Sachin Pilot targets Modi government over inflation, LPG prices and RBI repo rate hike : RBIच्या रेपो दरवाढीमुळे कर्जाचे व्याजदर आणि EMI वाढण्याची शक्यता असल्याचा दावा करत सचिन पायलट यांनी महागाई, LPGच्या वाढत्या किमती आणि बेरोजगारीवरून केंद्र सरकारला घेरले.

Pradeep Pendhare

Repo Rate Hike Impact : देशातील महागाई, वाढत्या इंधन आणि LPGच्या किमती तसेच बेरोजगारीच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

रिझर्व्ह बँकेच्या (RBI) मौद्रिक धोरण समितीने (MPC) रेपो दरात 0.25 टक्क्यांची वाढ केल्याच्या पार्श्वभूमीवर पायलट यांनी सरकारच्या आर्थिक धोरणांवर प्रश्न उपस्थित केले.

रेपो दरवाढीचा थेट परिणाम कर्जदारांवर होण्याची शक्यता असून, कर्जाचे व्याजदर आणि EMI वाढू शकतात, असा दावा सचिन पायलट (Sachin Pilot) यांनी केला. अशा परिस्थितीत मध्यमवर्गीय आणि कामगार वर्गाच्या खिशावर डाका घालण्यासारखेच झाले आहे, असे त्यांनी म्हटले.

सचिन पायलट म्हणाले, सरकारच्या आर्थिक गैरव्यवस्थापनामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. त्यातच तेल आणि LPGच्या वाढत्या किमती तसेच अन्नमहागाईचा थेट फटका मध्यमवर्ग आणि कामगार (Workers) वर्गाला बसणार आहे. RBIच्या व्याजदरवाढीचा परिणाम सर्व बँकांच्या कर्जदरांवर होऊ शकतो. त्यामुळे गृहकर्ज, वाहनकर्ज तसेच इतर कर्जांच्या EMIमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. महागाईचा सामना करत असलेल्या सर्वसामान्य नागरिकांवर रेपो दरवाढीमुळे अतिरिक्त आर्थिक भार पडेल, अशी भूमिका पायलट यांनी मांडली.

देशातील सध्याच्या आर्थिक परिस्थितीबाबत केंद्र सरकार उदासीन असल्याचा आरोपही त्यांनी केला. महागाई नियंत्रणात आणणे आणि रोजगारनिर्मिती करणे या दोन्ही आघाड्यांवर सरकारला अपयश आल्याचा दावा पायलट यांनी केला. सचिन पायलट यांनी यावेळी केंद्र सरकारच्या राजकीय भूमिकेवरही टीका केली. सत्तेत राहण्यासाठी सरकारकडून विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

केंद्र सरकार आर्थिक नियोजनात अपयशी

निवडणूक आयोगाचा कसा वापर करायचा, राजकीय व्यवस्थापन आणि मीडिया व्यवस्थापनावर सरकारचे अधिक लक्ष आहे. मात्र, देशाच्या आर्थिक परिस्थितीची सरकारला चिंता नाही, असा घणाघात पायलट यांनी केला. महागाई रोखणे आणि बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात केंद्र सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

देशात गुंतवणूक दिसत नाही

जागतिक पातळीवरील आर्थिक परिस्थिती चिंताजनक असल्याचे सांगत पायलट यांनी केंद्र सरकारने त्याचा अंदाज घेऊन देशांतर्गत आर्थिक नियोजन करण्याची गरज व्यक्त केली. जागतिक आर्थिक परिस्थितीचा अंदाज घेऊन केंद्र सरकारने देशांतर्गत आर्थिक नियोजन करायला हवे होते. त्यानुसार आवश्यक उपाययोजना आखायला हव्या होत्या. मात्र, देशात नवीन गुंतवणूकही प्रत्यक्षात दिसत नाही, असे पायलट यांनी म्हटले.

महागाई अन् रोजगाराच्या मुद्दा गंभीर

दरम्यान, RBIच्या रेपो दरातील वाढीवरून काँग्रेसने केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. सर्वसामान्यांच्या कर्जाचा खर्च वाढण्याची शक्यता असताना महागाई आणि रोजगाराच्या मुद्द्यावर सरकारने ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे पायलट यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT