Sugarcane Rate 5000 Per Ton : ऊसाला 5000 दर द्या, अन्यथा 1000 अनुदान; अभिजित पोटेंचा सरकारला इशारा, पुण्यात आंदोलनाची तयारी

Sugarcane farmers demand 5000 per tonne or 1000 subsidy as Abhijit Pote warns of an indefinite protest in Pune : 2026-27 च्या गाळप हंगामापूर्वी ऊस दर, 525 रुपयांचा दुसरा हप्ता आणि वजन काट्यांवरील गैरप्रकारांबाबत ठोस निर्णयाची मागणी
Abhijit Pote | Sugarcane farmers demand
Abhijit Pote | Sugarcane farmers demandSarkarnama
Published on: 
Updated on: 

Sugarcane FRP 2026-27 : शेतकऱ्यांच्या ऊसाला, कारखानदारांकडून प्रतिटन 5000 दर मिळावा, अन्यथा सरकारकडून 1000 रुपये अनुदान मिळावे, यासाठी मागणीसाठी सत्ताधारी महायुतीमधील भाजपच्या मित्र पक्ष एकनाथ शिंदे शिवसेनेच्या युवा नेते अभिजित पोटे यांनी शड्डू ठोकला आहे.

पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयावर उद्या गुरूवारी बेमुदत ठिय्या आंदोलनाची तयारी केली आहे.

सन 2026-27 च्या ऊस गाळप हंगामापूर्वी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर ठोस धोरणात्मक निर्णय घ्यावा, ऊसाला योग्य भाव मिळावा, वजन काट्यांमधील गैरप्रकारांना आळा घालावा तसेच साखर कारखानदारांकडून शेतकऱ्यांची होणारी कथित फसवणूक थांबवण्याची मागणी करताना, अभिजत पोटे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा (Amit Shah), मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच साखर आयुक्त यांच्याकडे अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीचा अहवाल पाठवला आहे.

दुष्काळाच्या झळा राज्याला बसू लागल्या आहेत. कमी पर्जन्यमानामुळे अनेक भागांत ऊस पिकाची अपेक्षित वाढ झालेली नाही. अशा परिस्थितीत गाळप हंगाम लवकर सुरू केल्यास साखर उतारा कमी होण्याची शक्यता असून त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना (Farmer) बसणार आहे. यामुळे ऊसाला प्रति टन 5000 रुपये भाव कारखानदाराने द्यावा. नाहीतर सरकारने प्रति टन 1000 रुपये अनुदान जाहीर करावे, अशी प्रमुख मागणी शिवसेनेचे अभिजित पोटे यांनी केली आहे.

Abhijit Pote | Sugarcane farmers demand
Ahilyanagar DCC Bank Election : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला विश्वासात घेतले नाही? बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितले

साखर कारखान्यांच्या वजन काट्यांमध्ये डिजिटल फेरफार होण्याच्या तक्रारींची दखल घेऊन आयटी इंजिनिअरचा समावेश असलेले भरारी पथक नियुक्त करावे. ऊसाचे वजन झाल्यानंतर 30 सेकंदांच्या आत शेतकऱ्याच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे वजनाची माहिती पाठवणे बंधनकारक करण्याचीही मागणी केली.

Abhijit Pote | Sugarcane farmers demand
Ahilyanagar DCC Bank Election : अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनेची एन्ट्री; थोरातांच्या बिनविरोध प्रयत्नांना धक्का?

'कुकडी'च्या व्यवहाराची चौकशी करा

श्रीगोंदा येथील कुकडी सहकारी साखर कारखान्याने सन 2023 मध्ये जाहीर केलेल्या ऊस दराबाबत, नंतर शेतकऱ्यांना कमी दर मिळाला आहे, असा गंभीर आरोप अभिजित पोटे यांनी केला. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित चेअरमन व संचालकांवर कारवाई करावी. तसेच शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई वसूल करावी.

मागील हंगामातील दुसरा हप्ता 525 रुपये द्या

सन 2025-26 च्या गाळप हंगामात साखर व उपपदार्थांना मिळालेल्या दराचा विचार करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन 525 रुपये दुसरा हप्ता तातडीने द्यावा. ऊस उत्पादकांच्या प्रश्नांवर केंद्र व राज्य सरकारने संघटनांच्या प्रतिनिधींसोबत सात ऑक्टोबरपर्यंत बैठक घेऊन चर्चा करावी. अन्यथा आठ ऑक्टोबरला पुण्यातील महात्मा फुले कृषी विद्यालय चौक ते साखर आयुक्त कार्यालय, असा शेतकऱ्यांचा मोर्चा काढून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा अभिजित पोटे यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांसाठी प्रमुख मागण्या

  • ऊसाला 5000 रुपये प्रतिटन भाव द्यावा किंवा 1000 रुपये प्रतिटन अनुदान द्यावे.

  • ऊस वजन काट्यांवरील डिजिटल गैरप्रकार रोखण्यासाठी आयटी तज्ज्ञांचे भरारी पथक नियुक्त करावे.

  • वजन झाल्यानंतर 30 सेकंदांत शेतकऱ्याला 'एसएमएस'द्वारे वजनाची माहिती द्यावी.

  • दोन कारखान्यांमधील 25 किलोमीटर अंतराची अट रद्द करावी.

  • ऊस वाहतूक खर्च प्रत्यक्ष अंतरानुसार आकारावा.

  • साखरेची एमएसपी 55 रुपये प्रतिकिलो करावी.

  • सन 2025-26 चा 525 रुपये प्रतिटन दुसरा हप्ता तातडीने द्यावा.

  • शेतकऱ्यांच्या हितासाठी साखर कायद्यात आवश्यक दुरुस्ती करावी.

  • कारखान्यांकडून होणाऱ्या गैरप्रकारांची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अभिजित पोटे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com