Rekha Gupta Sarkarnama
देश

Delhi CM Rekha Gupta : शपथविधीआधीच रेखा गुप्ता यांची मोठी घोषणा; पहिले आश्वासन पूर्ण करण्याची तारीख जाहीर...

Chief Minister News Oath taking Ceremony BJP Government : भाजपकडून दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची माळ रेखा गुप्ता यांच्या गळ्यात टाकण्यात आली आहे.  

Rajanand More

New Delhi News : भाजपच्या आमदार रेखा गुप्ता या दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेणार आहेत. रामलीला मैदानावर भव्य शपथविधी सोहळा होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक नेते यावेळी उपस्थित असणार आहेत. त्याआधीच गुप्ता यांनी एक मोठी घोषणा केली आहे. भाजपने जाहीरनाम्यात दिलेले एक मोठे आश्वासन पूर्ण करण्याची तारीख त्यांनी सांगितली आहे.

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपकडून दिल्लीतील महिलांना प्रति महिना 2500 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन लगेचच पूर्णही केले जाणार आहे. येत्या 8 मार्चला म्हणजेच जागतिक महिला दिनी महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होण्यास सुरूवात होईल, असे गुप्ता यांनी जाहीर केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न पूर्ण करणे, ही दिल्लीतील भाजपच्या सर्व 48 आमदारांची जबाबदारी आहे, असे त्या म्हणाल्या.

आम्ही आमची सर्व आश्वासने पूर्ण करू. त्यामध्ये महिलांना देण्यात येणारा मदतनिधीचाही समावेश आहे. दिल्लीतील महिलांच्या खात्यात आठ मार्चपर्यंत 2500 रुपये जमा होण्यास सुरूवात होईल, असे गुप्ता यांनी स्पष्ट केले. दरम्यान, भाजपप्रमाणे आम आदमी पक्ष आणि काँगेसनेही महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे आश्वासन दिले होते.

रेखा गुप्ता या दिल्लीतील चौथ्या महिला मुख्यमंत्री असणार आहेत. भाजपच्या सुषमा स्वराज या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. त्यानंतर काँग्रेस नेत्या शीला दीक्षित तब्बल 15 वर्षे मुख्यमंत्री राहिल्या. तर आपच्या नेत्या आतिशी यांना काही महिन्यांसाठी हे पद मिळाले होते. आता रेखा गुप्ता पुढील पाच वर्षे राज्याच्या मुख्यमंत्री असतील.

भाजपने कोणती आश्वासने दिली होती?

महिलांना मदतनिधी देण्याबरोबरच भाजपने अनेक आश्वासने दिली होती. त्यामध्ये गर्भवती महिलां 21 हजार रुपये, गॅस सिलेंडरवर 500 रुपये अनुदान, होळी आणि दिवाळीत एक-एक सिलेंडर मोफत, पाच रुपयांत पोटभर जेवणासाठी अटल कँटीन, पंतप्रधान आयुष्यमान भारत योजनेची अंमलबजावणी, ज्येष्ठ नागरिकांना 3 हजार रुपये पेन्शन आदी घोषणा भाजपकडून करण्यात आल्या होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT