Delhi New CM Rekha Gupta : दिल्लीत भाजपनं आपला 'सीएम'पदासाठीचा 'तो' पॅटर्न बदलला; रेखा गुप्ता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री

Delhi CM News : दिल्लीत भाजपनं मुख्यमंत्रिपदासाठीचा धक्कातंत्र पॅटर्न बदलला असून रेखा गुप्ता यांच्याकडेच दिल्लीच्या मुख्यमंत्रि‍पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दिल्लीत भाजपचा उपमुख्यमंत्री नसणार आहे.
Rekha gupta  .jpg
Rekha gupta .jpgSarkarnama
Published on
Updated on

Delhi News : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले होते. मुख्यमंत्रिपदासाठी प्रवेश वर्मा,विजेंद्र गुप्ता, सतीश उपाध्याय, पवन शर्मा, आशिष सूद, रेखा गुप्ता, शिखा राय, रवींद्र इंद्रराज सिंह आणि कैलाश गंगवाल यांच्या नावांची चर्चा सुरू होती. पण अखेर भाजपकडून दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता (Rekha Gupta) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठकी बुधवारी (ता.19) दिल्लीत पार पडली. या बैठकीत रेखा गुप्ता यांच्या नावाची नवनिर्वाचित भाजप आमदारांकडून विधीमंडळ नेता म्हणून निवड करण्यात आली. त्यामुळे दिल्लीच्या मुख्यमंत्री (Delhi cm) म्हणून रेखा गुप्ता यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे.

दिल्लीत भाजपनं पॅटर्न बदलला असून रेखा गुप्ता यांच्याकडे दिल्लीच्या मुख्यमंत्रि‍पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दिल्लीत भाजपचा उपमुख्यमंत्री नसणार आहे. भाजप उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांची भेट घेईल आणि दिल्लीत सरकार स्थापनेचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. राज्यपालांना नवनिर्वाचित भाजप (BJP) आमदारांची यादी देखील देण्यात येईल. यानंतर उपराज्यपाल हा प्रस्ताव राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवतील.

Rekha gupta  .jpg
Santosh Deshmukh Murder : अंजली दमानियांच्या आरोपाला सत्ताधारी आमदाराचा दुजोरा; ‘त्यांच्याबाबत हे होऊ शकतं...’

दिल्लीमध्ये भाजपनं अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षाला मोठा धक्का देत सत्ता मिळवली, तब्बल 27 वर्षांनंतर दिल्लीमध्ये भाजपची सत्ता आली. निकाल लागून दहा दिवसांहून अधिक दिवस झाल्यानं दिल्लीचे नवे मुख्यमंत्री कोण असणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.

दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कार्यक्रम गुरुवारी म्हणजेच 20 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. त्यामुळे नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कार्यक्रमाची तयारी रामलीला मैदानावर जय्यत तयारी सुरू आहे.

Rekha gupta  .jpg
Abdul Sattar V/s Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांनी दहा वर्ष पालकमंत्री राहावं, मला काही फरक पडत नाही!

हरियाणा, गोवा, कर्नाटक आणि त्रिपुरा, आसाम आणि मध्य प्रदेशमधील निवडणुका जिंकल्यानंतर अशा काही राज्यांमध्ये मोदी-शाह या जोडीने धक्कातंत्राचा वापर करत भल्याभल्यांना चकवत भाजपने मुख्यमंत्री म्हणून नवीन चेहरे निवडले होते. आता दिल्लीतही ते धक्कातंत्राचा अवलंब करून नव्या चेहऱ्याला संधी देणार का, याची उत्सुकता शिगेला पोहचली होती. पण अखेर रेखा गुप्ता यांच्या नावावर भाजपकडून शिक्कामोर्तब करण्यात आलंं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com