CM Rekha Gupta Insight Story Sarkarnama
देश

Delhi CM Rekha Gupta: दोन वेळा पराभूत, पहिल्यांदाच आमदार, RSSकडून शिफारस; CM रेखा गुप्ता यांची इनसाईट स्टोरी

CM Rekha Gupta Insight Story: दिल्लीत महिला मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा असल्याचे बोलले जाते. आरएसएसने रेखा गुप्ता यांचे नाव पुढे केले. तो प्रस्ताव भाजपने स्वीकारला आहे.

Mangesh Mahale

New Delhi: दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी रेखा गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत. शालीमार विधानसभा मतदारतून पहिल्यांदाच आमदार झालेल्या रेखा गुप्ता यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली आहे.

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार याची चर्चा सुरु होती. प्रवेश वर्मा यांचे नाव या पदासाठी आघाडीवर होते. बुधवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत 48 आमदारांच्या उपस्थित विधीमंडळाच्या बैठकीत त्यांच्या नावाला पसंती मिळाली आहे. विधीमंडळाच्या नेतेपदी रेखा गुप्ता यांची निवड करण्यात आली.

त्यांनी आमदारकीची दोन वेळा निवडणूक लढवली होती, पण त्यांना यश आले नव्हते. या निवडणुकीत आम आदमी पार्टीच्या उमेदवार वंदना कुमारी यांचा त्यांनी पराभव केला. वंदना कुमारी यांनी गुप्ता यांचा दोनवेळा पराभव केला आहे.

दिल्लीत महिला मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा असल्याचे बोलले जाते. आरएसएसने रेखा गुप्ता यांचे नाव पुढे केले. तो प्रस्ताव भाजपने स्वीकारला आहे. रेखा गुप्ता या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री होणार आहेत. आज दुपारी साडेबारा वाजता त्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. रेखा गुप्ता या भाजपच्या एकमेव महिला मुख्यमंत्री असणार आहेत.

ज्या दिवशी दिल्ली निवडणुकीचा निकाल लागला त्याच दिवशी मुख्यमंत्रीपदासाठी रेखा गुप्ता यांचे नाव फायनल झाल्याचे भाजपच्या सुत्रांकडून सांगण्यात आले. दोन वेळा निवडणूक हरलेल्या अन् पहिल्यादांच आमदार झालेल्या रेखा गुप्ता यांच्या गळ्यात भाजपने मुख्यमंत्रिपदाची माळ का घातली, यांची चर्चा सध्या सुरु आहे.

रेखा गुप्ता यांची स्वच्छ प्रतिमा, आरएसएसशी असलेले त्यांच्या कुटुंबियांचे संबध यामुळे त्यांचे नाव भाजपने मुख्यमंत्रीपदासाठी फायनल केल्याचे सांगितले जाते. दिल्लीला महिला मुख्यमंत्रिपदाची परंपरा असल्याने रेखा गुप्ता यांना भाजपने मुख्यमंत्री बनवले, असल्याचे सांगण्यात येते.

काँग्रेसच्या शीला दीक्षित, भाजपच्या सुषमा स्वराज, आपच्या आतिथी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. आता रेखा गुप्ता यांना मुख्यमंत्री करुन महिला मतदारांना आकर्षित करण्याचे काम भाजप करीत असल्याची चर्चा आहे. दिल्ली विधानसभेचा निकाल लागल्यानंतर 12 दिवसानंतर मुख्यमंत्रीपदाचे नाव जाहीर केले आहे.

रेखा गुप्ता यांचा शपथविधी आज रामलीला मैदानावर होणार आहे. सकाळी साडेबारा वाजता शपथविधी सोहळ्यास सुरवात हौणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रेखा गुप्ता या मुख्यमंत्रीपदी पदाची शपथ घेणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डी आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT