Manoj Jha Sarkarnama
देश

Jharkhand Assembly Election : झारखंडमध्ये I.N.D.I.A आघाडीत बिघाडीची चिन्हं ; 'RJD'ने जागा वाटपावर नाराजी दर्शवत घेतली मोठी भूमिका

RJD Manoj Jha : '3 ते 4 जागांवर निवडणूक लढवण्यास सांगणे म्हणजे गळा कापण्यासारखे आहे.' सदार मनोज झा यांनी म्हटले आहे.

Mayur Ratnaparkhe

Jharkhand Vidhan Sabha Election News: महाराष्ट्राप्रमाणे झारखंडमध्येही विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. आतापर्यंत भाजप आणि आजसू पार्टीला या ठिकाणी धक्के बसत होते. मात्र आता विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीतच बिघाडी होण्याची चिन्हं दिसत आहेत. राजदने झारखंडमध्ये 22 जागांवर आपला दावा सांगितला आहे.

राजदचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार मनोज कुमार झा यांनी रविवारी रांची येथे पत्रकारपरिषदेत सांगितले की, 22 जागांवर पक्षाची स्थिती मजबूत आहे. त्यांनी सांगितले की, मागील निवडणुकीतही आरजेडी सात जागांवर निवडणूक लढली होती. ज्यामध्ये एका जागेवर विजय मिळाला आणि पाच जागांवर फार कमी फरकाने पराभव झाला.

मनोज कुमार झा यांनी म्हटले की, जागा वाटपात आरजेडीकडे दुर्लक्ष केले गेलं आहे. जेएमएम-काँग्रेस(Congress) यांच्यावतीने जाहीर करण्यात आलेला जागा वाटपाचा फॉर्म्युला तर्कसंगत नाही. मात्र त्यांनी आघाडी तोडण्याबाबत तूर्तास तरी काहीच प्रतिक्रिया दिली नाही.

खासदार मनोज झा यांनी म्हटले की, राष्ट्रीय जनता दलाने तुरुंगात जाणे स्वीकरले आहे, अत्याचार सहन केले आहेत परंतु राजदने कधीच भाजपच्या(BJP) वॉशिंग मशीन समोर नतमस्तक होणे मान्य केले नाही. आम्ही 60 जागांवर महाआघाडीला मदत करू. परंतु जिथे आमची मजबूत दावेदारी आहे, ते मतदारसंघ आम्ही सोडणार नाहीत. आम्हाला भाजपला हरवायचं आहे.

याशिवाय मनोज कुमार झा(Manoj Kumar Jha) यांनी सांगितले की, सन्मानजनक जागा मिळायला हव्यात. मुख्यमंत्री निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत आरजेडीला तीन ते चार जागांवर निवडणूक लढण्यास सांगणे, म्हणजे गळा कापण्यासारखे आहे. तसेच त्यांनी सांगितले की, 2014 आणि 2019मध्ये ज्या जागांवर आरजेडी उमेदवार रनर अप आहेत. 2019 मध्येही पक्ष पाच जागांवर रनर अप राहिला आहे. परंतु यंदा परिस्थिती वेगळी आहे. यंदा अनेक जागांवर राजद भक्कम आहे. परंतु त्यानुसार जागांचे वाटप न होणे दुर्दैवी आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT