Congress Delhi News: विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता दोनच दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची लगबग सुरु होणार आहे. एकीकडे रविवारी भाजपने पहिली उमेदवारी अर्ज जाहीर करीत या निवडणुकीत आघाडी घेतली आहे. ही यादी जाहीर करताना 99 उमेदवार जाहीर केले आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीची जागावाटपाची चर्चा रखडली आहे.
सोमवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन आघाडीची घोषणा होईल, असे वाटत असतानाच सोमवारी सकाळी होणारी पत्रकार परिषद रद्द केल्याने आघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटला नसल्याचे पुढे आले आहे. काँग्रेस व ठाकरे सेनेत (Shivsena) विदर्भातील चार जागेवरून मतभेद असल्याचे पुढे आले आहे.
विदर्भतल्या काही जागांवरून काँग्रेस (Congress) आणि ठाकरे सेनेत वाद आहेत. विदर्भात विधानसभेच्या 62 जागा आहेत. पैकी शरद पवार गट आणि ठाकरे गटाला काँग्रेसनं प्रत्येकी आठ जागा देऊ केल्या आहेत. ठाकरेसेना 12 जागांसाठी आग्रही आहे.
पण या जागा सोडण्यास काँग्रेस तयार नाही. त्यामुळे मतभेद वाढले आहेत. ते थेट दिल्लीपर्यंत गेले आहेत. सोमवारी दुपारी ठाकरेंनी मातोश्रीवर पक्षातील प्रमुख नेत्यांची तातडीची बैठक बोलावली होती. त्यानंतर आता काँग्रेसनं दिल्लीत महत्त्वाची बैठक बोलावली आहे.
काँग्रेसच्या उमेदवारांची यादी आजच जाहीर केली जाणार होती. पण ठाकरेसेनेसोबत झालेल्या मतभेदांमुळे काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक समितीची बैठक एकाएकी रद्द केली. त्यामुळे उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब झालं नाही. याच कारणानं यादी जाहीर करणे थांबले आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक सुरु आहे. ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जागावाटपावरुन झालेले मतभेद बैठकीच्या केंद्रस्थानी आहेत.
विदर्भातील 4 जागांवरुन काँग्रेस, ठाकरेसेनेत मतभेद आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी खरगे यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीतील निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
काँग्रेसच्या स्क्रिनिंग कमिटीची बैठक २ दिवसांपूर्वीच संपन्न झाली. या बैठकीत पहिल्या यादीतील उमेदवार निश्चित झाले. त्यांच्या नावांवर केंद्रीय निवडणूक कमिटीच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार होतं. ती बैठक आज होणार होती. पण ठाकरेसेनेत झालेल्या वादानंतर ती बैठक रद्द करण्यात आली. ही बैठक उद्या संध्याकाळी 5 वाजता होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.