TG Mohandas was detained by Kerala Police over controversial remarks concerning NEET protestors at Jantar Mantar. The case has sparked a political controversy. Sarkarnama
देश

TG Mohandas Arrested : जंतर-मंतरवरील आंदोलक मुलींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारे RSS विचारवंत अटकेत; पोलिसांनी थेट घरातून उचललं

Kerala Cyber Crime Police : टी. जी. मोहनदास यांनी त्यांच्या ‘पत्रिका’ नावाच्या यूट्यूब चॅनेलवर जंतर-मंतर येथील NEET आंदोलनाबाबत बोलताना हिंसक कारवाईचे समर्थन करणारे वक्तव्य केल्याचा आरोप आहे. तसेच आंदोलनातील महिलांबाबतही त्यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती.

Jagdish Patil

Kerala Cyber Crime Police : दिल्लीतील जंतर-मंतर येथे NEET पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य करणारे उजव्या विचारसरणीचे समर्थक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेले टी. जी. मोहनदास यांना केरळ पोलिसांनी अटक केली आहे.

तिरुवनंतपुरम सिटी सायबर क्राइम पोलिसांच्या पथकाने कोचीतील मट्टनचेरी येथील त्यांच्या निवासस्थानी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले. मोहनदास यांनी त्यांच्या ‘पत्रिका’ नावाच्या यूट्यूब चॅनेलवर जंतर-मंतर येथील NEET आंदोलनाबाबत बोलताना हिंसक कारवाईचे समर्थन करणारे वक्तव्य केल्याचा आरोप आहे. तसेच आंदोलनातील महिलांबाबतही त्यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. या वक्तव्यांनंतर त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत केरळचे गृहमंत्री रमेश चेन्निथला यांनी पोलिसांना मोहनदास यांच्या वक्तव्याची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर तिरुवनंतपुरम सिटी सायबर क्राइम पोलिसांनी तपास सुरू केला.

डिजिटल उपकरणे ताब्यात

या प्रकरणाच्या तपासासाठी रविवारी सायबर पोलिसांचे पथक मट्टनचेरी परिसरातील कुवाप्पडम येथील मोहनदास यांच्या घरी पोहोचले. पोलिसांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलशी संबंधित माहिती गोळा केली. तसेच घरातून काही डिजिटल उपकरणे ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मोहनदास यांच्याविरोधात सार्वजनिक शांतता भंग करण्यासह समाजात भीती निर्माण होईल, अशा स्वरूपाच्या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

मोहनदास यांनी नेमकं काय म्हटलं?

NEET पेपरफुटीविरोधात जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाबाबत बोलताना मोहनदास यांनी पोलिसांच्या कारवाईसंदर्भात अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. आंदोलन नियंत्रणात आणण्याची जबाबदारी आपल्याकडे असती, तर सर्वप्रथम जंतर-मंतर परिसरात कर्फ्यू लागू केला असता, असं त्यांनी म्हटलं होतं.

त्यानंतर आंदोलकांना परिसरातून हटण्याचे आदेश दिले असते. सूचना देऊनही गर्दी पांगली नाही, तर थेट गोळीबार केला असता आणि काही तासांत परिस्थिती नियंत्रणात आणली असती, असा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर मृतदेह गोळा करून रुग्णालयात पाठवले असते, असंही त्यांनी म्हटलं होतं.

याशिवाय, त्यांनी जंतर-मंतरवरील महिला आंदोलकांबाबतही अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. "जंतरमंतर भागातून पोलिसांचा बंदोबस्त काढून टाकायला हवा. मग तिथे खून आणि बलात्कार होऊ द्यावेत. बलात्काराची तक्रार दाखलही होणार नाही. कारण त्या महिलांना बलात्कार करून घ्यायला आवडतात.", असं त्यांनी म्हटलं होतं. आता हेच वक्तव्य त्यांच्या अंगलट आलं आहे.

दरम्यान, टी. जी. मोहनदास यांच्यावरील पोलिसांच्या कारवाईवर भाजपने आक्षेप घेतला आहे. ही कारवाई भेदभावपूर्ण असून केरळमधील पूरस्थिती हाताळण्यात सरकार अपयशी ठरलं असून त्या मुद्द्यावरून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी मोहनदास यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT