Buldhana Name Change : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्याचे नाव आता 'राजमाता जिजाऊनगर' होणार; भाजप आमदाराच्या पत्रानंतर CM फडणवीसांकडून कार्यवाहीचे निर्देश

hweta Mahale demand Buldhana name change : 'अहिल्यानगरच्या धर्तीवर बुलढाणा जिल्ह्याचे नाव ‘राजमाता जिजाऊनगर’ करण्याचा निर्णय घेतल्यास समस्त शिवप्रेमी आणि जिजाऊप्रेमींच्या भावनांचा सन्मान होईल. या मागणीची मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक दखल घेत सामान्य प्रशासन विभागाला पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही निश्चितच समाधानाची आणि आशेची बाब आहे.'
BJP MLA Shweta Mahale has demanded that Buldhana district be renamed Rajmata Jijau Nagar in honour of Rajmata Jijau.
BJP MLA Shweta Mahale has demanded that Buldhana district be renamed Rajmata Jijau Nagar in honour of Rajmata Jijau.Sarkarnama
Published on
Updated on

Buldhana Name Change : भाजप आमदार श्वेता महाले यांनी बुलढाणा जिल्ह्याचे नाव 'राजमाता जिजाऊनगर' करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात आमदार महाले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिलं आहे. या निवेदनातून त्यांनी बुलढाणा जिल्ह्याचे नामकरण करण्याची मागणी केली आहे.

श्वेता महाले यांच्या निवेदनानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी बुलढाणा जिल्ह्याचे नाव ‘राजमाता जिजाऊनगर’ करण्यासाठी प्रशासनाला कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्याची माहितीही महाले यांनी दिली आहे. या संदर्भातील माहिती त्यांनी फेसबूक पोस्टद्वारे दिली.

त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं की, 'राजमाता जिजाऊसाहेबांच्या जन्मभूमीचा सन्मान आणि असंख्य शिवप्रेमींच्या भावनांचा आदर करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्याचे नाव ‘राजमाता जिजाऊनगर’ करण्याची मागणी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

मातृतीर्थ सिंदखेड राजा ही राजमाता जिजाऊसाहेबांची जन्मभूमी आहे, ही संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यासाठीच नव्हे, तर महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. बाल शिवबांच्या मनात हिंदवी स्वराज्याचे बीज पेरून छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाला घडवण्यात राजमाता जिजाऊसाहेबांचे योगदान अतुलनीय आहे.

BJP MLA Shweta Mahale has demanded that Buldhana district be renamed Rajmata Jijau Nagar in honour of Rajmata Jijau.
MP Naresh Mhask : 'नीट'सारख्या गंभीर विषयावर राजकारण टाळावे, खासदार नरेश म्हस्के यांचा विरोधकांना टोला
BJP MLA Shweta Mahale has demanded that Buldhana district be renamed Rajmata Jijau Nagar in honour of Rajmata Jijau.
Ahilyanagar Market Safety : ‘पुन्हा हल्ला झाला तर पोलिसांवरच कारवाई’; अहिल्यानगरच्या बाजारपेठेतील दहशतीवर विखे पाटील संतापले

बुलढाणा जिल्ह्याला लोणार सरोवर, शेगावचे श्री गजानन महाराज मंदिर, मेहकरचे श्री शारंगधर बालाजी मंदिर, ज्ञानगंगा अभयारण्य, सैलानी बाबा दर्गा यांसारख्या धार्मिक व पर्यटनस्थळांची समृद्ध परंपरा लाभली आहे. देश-विदेशातून येथे येणाऱ्या पर्यटकांच्या माध्यमातून राजमाता जिजाऊसाहेबांचे नाव जगभर पोहोचावे, हादेखील या मागणीमागील उद्देश आहे.

अहिल्यानगरच्या धर्तीवर बुलढाणा जिल्ह्याचे नाव ‘राजमाता जिजाऊनगर’ करण्याचा निर्णय घेतल्यास समस्त शिवप्रेमी आणि जिजाऊप्रेमींच्या भावनांचा सन्मान होईल. या मागणीची मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक दखल घेत सामान्य प्रशासन विभागाला पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही निश्चितच समाधानाची आणि आशेची बाब आहे.

BJP MLA Shweta Mahale has demanded that Buldhana district be renamed Rajmata Jijau Nagar in honour of Rajmata Jijau.
Raigad Politics : शिवसेनेनं ताकद लावलेल्या पालकमंत्रीपदावर राज ठाकरेंचा खोचक टोला; सरकारला सल्ला, तटकरे कुटुंबाला टोला

राजमाता जिजाऊसाहेबांच्या पवित्र स्मृतींना हीच खरी आदरांजली ठरेल," असं महाले यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये लिहिलं आहे. त्यामुळे आता औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव, आणि अहमदनगरचे नामकरण आहिल्यानगर केल्यानंतर राज्यातील आणखी एका जिल्ह्याचे नाव बदलण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com