sarkarnama
देश

गांधी कुटुंबीयांचा राजीनामा खरा की खोटा? आज कोअर कमिटीची बैठक

गांधी कुंटुबीय खरंच राजीनामा देणार ही अफवा आहे का, हे काही तासातच समजणार आहे.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पंजाब, गोवा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाचे आत्मचिंतन करण्यासाठी आणि पुढील रणनीती ठरविण्यासाठी आज कॅाग्रेसच्या (Congress) कोअर कमिटीची बैठक होत आहे.

पाच राज्यातील निवडणुकांमध्ये सपाटून मार खाल्यानंतर गांधी कुंटुबीय राजीनामा देणार याची सध्या राजकीय पटलावर चर्चा सुरु आहे. गांधी कुंटुबीय खरंच राजीनामा देणार का ही अफवा आहे, हे काही तासातच समजणार आहे. पाच राज्यांमधल्या निकालांवर बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

कॉग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi), राहुल गांधी (Rahul Gandhi)आणि प्रियंका गांधी पक्षातील पदाचा राजीनामा देणार असल्याचं वृत्त एका वृत्तवाहिनीने नुकतेच दिले आहे. यामुळे कॉग्रेसच्या गोटात उलटसुलट चर्चा सुरु आहे.

याबाबत काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी यावर खुलासा केला आहे. हे वृत्त चुकीचे असल्याचे स्पष्ट केलं आहे. कॉग्रेसमधील नाराज जी-२३ (G-23)पुन्हा सक्रिय झाले आहे. कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आजाद यांच्या घरी 'जी २३' नेत्यांची शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत नव्या अध्यक्षांची मागणी करण्यात आल्याचे समजते.

''कॅाग्रेसने लवकरात लवकर आपतकालीन बैठक बोलवून नव्या अध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावी,'' अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. या बैठकीला कपिल सिब्बल, मनीष तिवारी आदी नेते उपस्थित होते . यापूर्वी जी-२३ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून अध्यक्ष निवडीबाबत सांगितले होते. 'पाचही राज्यात कॉग्रेसचा पराभव होईल,' हे निकालापूर्वीच या नेत्यांनी सांगितले होते. कारण निकालाच्या पूर्वीच (१० मार्च) कॉग्रेसचे नेता राहुल गांधी यांच्या घरी बैठक झाली होती.

या बैठकीला छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, कॉग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वा़ड्रा, महासचिव केसी वेणुगोपाल आदी उपस्थित होते. 'सप्टेंबर २०२२ पर्यत नवीन अध्यक्षाची निवड करण्यात यावी,' असे या बैठकीत ठरले. काँग्रेसच्या जी-२३ नेत्यांच्या गटामधील सदस्यांनी अनेक दिग्गज नेत्यांनी हा पराभव म्हणजे 'आम्ही तुम्हाला आधीच कल्पना दिलेली' अशा प्रकारचा आहे. काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे सदस्य असणाऱ्या गुलाम नबी आजाद यांनी, ''मी थक्क झालोय. एकामागोमाग एक वेगवगेळ्या राज्यांमध्ये पक्षाचा पराभव पाहून मनाला फार उदास वाटतं. आम्ही पक्षासाठी आमच्या तारुण्याचा संपूर्ण काळ आणि आयुष्य दिलंय,'' असं म्हणत नाराजी व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT