Congress Leader Kamalnath Sarkarnama
देश

Congress Leader Kamalnath : काँग्रेस नेते कमलनाथ हातात कमळ घेणार? नव्या वक्तव्याने राजकारणात खळबळ

Rumours of joining BJP : राजकीय नेते मुक्त असतात, म्हणजे काय? ट्विट करून चर्चेला पूर्णविराम देण्याचाही प्रयत्न

Avinash Chandane

Madhya Pradesh Political News :

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस खासदार कमलनाथ सध्या चर्चेत आहेत. मध्य प्रदेशमधील निवडणुकीत काँग्रेस चमकदार कामगिरी करू न शकल्याने त्यांना साइडट्रॅक केल्याची चर्चा होती. आणि तेव्हापासून ते नाराज असल्याचीही चर्चा आहे. आता त्यात आणखीही एका चर्चेची भर पडली आहे. ती कमलनाथ यांच्या राजकीय अस्तित्वाची.

काही दिवसांपासून कमलनाथ काँग्रेस (Congress) सोडणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावरून कमलनाथ नक्की काय करणार आहेत, यावरून चर्चांना उधाण आले आहे. त्यावर कमलनाथ यांनी अतिशय सूचक उत्तर दिले आहे.

कमलनाथ (Congress Leader Kamalnath) छिंदवाडाचे खासदार आहेत आणि नऊ वेळा ते या मतदारसंघातून संसदेत गेले आहेत, पण विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला यश न मिळाल्याने पक्षनेतृत्व त्यांच्यावर नाराज असल्याची चर्चा होती. त्यावरून ते भाजपमध्ये (BJP) जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्याचवेळी त्यांचे सहकारी आचार्य प्रमोद क्रिश्नम भाजपमध्ये जात असल्याची चर्चा सुरू झाली. नेमके याचबाबत त्यांना विचारण्यात आल्यावर त्यांनी दिलेले उत्तर गोंधळात आणखी भर टाकणारे आहे.

कमलनाथ म्हणाले, राजकीय नेते मुक्त असतात. त्यांना कुणीही पक्षाच्या दावणीला बांधू शकत नाही. झालं असं की, क्रिश्नम यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेऊन त्यांना उत्तर प्रदेशमधील श्री काल्की धामच्या पायाभरणीसाठी निमंत्रण दिले. हा कार्यक्रम 19 फेब्रुवारीला होणार आहे.

विशेष म्हणजे याच क्रिश्नम यांनी श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला काँग्रेसने न जाण्याच्या निर्णयावर टीका केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विशेष म्हणजे कमलनाथ यांच्यासोबतच राज्यसभा सदस्य विवेक तनखा यांच्या नावाचीही अशीच चर्चा आहे. दरम्यान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिल्ली दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याशी या काँग्रेस नेत्यांविषयीही चर्चा केल्याचे बोलले जाते. कमलनाथ यांना राज्यसभेवर पाठवतानाच त्यांच्या मुलाला छिंदवाडामधून लोकसभेची उमेदवारी दिली जाण्याची चर्चा झाल्याचे बोलले जाते.

हुकूमशाहीविरोधात काँग्रेसचीच विचारधारा

कमलनाथ यांच्या भाजपमध्ये जाण्याची चर्चा वाढल्यानंतर त्यांनीच ट्विट करून चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. यात त्यांनी म्हटलंय, काँग्रेसची विचारधारा सत्य, धर्म आणि न्यायाची विचारधारा आहे. देशातील सर्व धर्म, जाती, प्रदेश, भाषा आणि विचारांना काँग्रेसच्या विचारधारेत समान स्थान आहे. काँग्रेसच्या 138 वर्षांच्या इतिहासातील बहुतांश काळ हा संघर्ष आणि सेवेत गेला आहे. स्वातंत्र्याच्या आंदोलनात हुकूमशाहीविरोधात संघर्ष करण्यासाठी काँग्रेस नेत्यांमध्ये अहमिका लागली होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राष्ट्रनिर्माण करणे हेच काँग्रेसचे एकमेव ध्येय आहे. आज जेव्हा देशात विरोधी पक्षाला कमकुवत करण्याचा प्रयत्न होत आहे. लोकशाहीवर हल्ले होत आहेत तेव्हाही काँग्रेसचीच विचारधारा हुकूमशाहीविरोधात लढणार आहे आणि देशाला जगातील सर्वांत सुंदर तसेच मजबूत लोकशाही देश बनवणार आहे. आम्ही गांधी, नेहरू आणि आंबेडकर यांच्या मार्गाने चालत सुवर्ण भारताची निर्मिती करू.

(Edited by Avinash Chandane)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT