Narendra Modi : 5 वर्षांतील भाजप सरकारच्या कामगिरीसाठी पंतप्रधान मोदींनी वापरले 'हे' खास तीन शब्द!

PM Narendra Modi In Loksabha : "17 व्या लोकसभेनं पाच वर्षात देशसेवेसाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले", असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं.
PM Narendra Modi
PM Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शनिवारी ( 10 फेब्रुवारी ) शेवटचा दिवस आहे. संसदेत आज श्री राम मंदिर उभारणीसाठी आभार प्रस्ताव मांडला गेला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Pm Narendra Modi ) यांनी लोकसभेत भाष्य केलं आहे. "17 व्या लोकसभेला देश आशीर्वाद देत राहील," असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.

PM Narendra Modi
Mood Of Nation : योगी आदित्यनाथ देशातील सर्वात लोकप्रिय CM, एकनाथ शिंदे कोणत्या क्रमांकावर?

पंतप्रधान मोदी म्हणाले, "लोकशाहीच्या परंपरेचा आज मोठा दिवस आहे. 17 व्या लोकसभेनं पाच वर्षात देशसेवेसाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. अनेक अडचणींचा सामना करत सगळ्यांनी आपल्या सामर्थ्यानं देशाला दिशा देण्याचा प्रयत्न केला."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"गेली पाच वर्षे देशाच्या रिफॉर्म (सुधारणा), परफॉर्म (कामगिरी) आणि ट्रान्सफॉर्मची (परिवर्तन) होती. पण, तिन्ही गोष्टी एकाच वेळी घडताना पाहणं फारच दुर्मिळ आहे. १७ व्या लोकसभेला देश आशीर्वाद देत राहील," असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे.

PM Narendra Modi
Narendra Modi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मराठी गुरूच्या गावाला भेट देणार? 'स्वाभिमानी'ने पाठवले निमंत्रण

"लोकसभेच्या पहिल्या सत्रात दोन्ही सभागृहांनी 30 विधेयके मंजूर केली. हा एक विक्रम आहे. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे झाल्यानिमित्त सभागृहानं महत्वाचं काम केलं आहे. तसेच, संविधान लागू करूनही 75 वर्षे पूर्ण झाली," असं मोदींनी सांगितलं.

PM Narendra Modi
PM Narendra Modi : सरकारच्या ‘व्हाइट पेपर’ला काँग्रेसनं लावली काळी तीट! मोदी खूश झाले अन् म्हणाले...

"याच काळात भारताला जी-20 चे अध्यक्षपद मिळाले. ही खूप सन्माजनक बाब आहे. जी-20 च्या माध्यमातून देशातील प्रत्येक राज्यानं भारताची ताकद आणि ओळक जगासमोर मांडली. त्याचा प्रभाव अजूनही जगाच्या मनावर आहे," असं मोदींनी म्हटलं.

PM Narendra Modi
Modi Government News: राजकीय विरोधकांना 'भारतरत्न'! PM मोदींचा 'मास्टरस्ट्रोक'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com