MP Manish Tiwari Sarkarnama
देश

Congress News : काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय काय? आणखी एका बड्या नेत्यानं वाढवलं टेन्शन...

Manish Tiwari News : खासदार मनिष तिवारी काँग्रेसला रामराम ठोकणार असल्याची चर्चा आहे. ते पंजाबमधील बडे नेते आहेत.

Rajanand More

New Delhi News : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ पक्षाला भगदाड पाडून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. आता पंजाबमधूनही काँग्रेसला धक्का देणारे वृत्त आहे. खासदार मनीष तिवारीही भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. ते भाजपच्या तिकीटावर लुधियाना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असल्याचे समजते. (Congress News)

मनीष तिवारी (Manish Tiwari) हे पंजाबमधील आनंदपूर साहिब मतदारसंघाचे खासदार आहे. अत्यंत अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी अनेकदा काँग्रेस पक्षातील काही निर्णयांवर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. पंजाबमधील (Punjab) विधानसभा निवडणुकीवेळीही त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. त्याचवेळी ते पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा होती.

आता पुन्हा तिवारी हे भाजपच्या (BJP) संपर्कात असल्याची चर्चा आहे. आगामी लोकसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये प्रवेश करून लुधियाना मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात, अशीही चर्चा आहे. मनीष तिवारी यांच्य कार्यालयाकडून मात्र हे वृत्त फेटाळण्यात आले आहे. मनीष तिवारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आधारहीन असल्याचे कार्यालयाकडून सांगण्यात आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तिवारी हे त्यांच्या मतदारसंघातून असून विकासकामांचा आढावा घेत आहेत. काल रात्री ते एका काँग्रेस कार्यकर्त्याच्या घरी मुक्कामी होते, असेही कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले. मनीष तिवारी यांनी मात्र अद्याप या चर्चेवर भाष्य केलेले नाही.

कमलनाथ राज्यसभेसाठी होते इच्छूक?

कमलनाथ हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. ते काँग्रेसवर नाराज असल्याची चर्चा असून त्यामागचे आणखी एक कारण समोर आले आहे. त्यांना राज्यसभेचे तिकीट हवे होते. पण पक्षाकडून तिकीट नाकारण्यात आल्याने ते भाजपमध्ये जाण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT