Kamal Nath, Jitu Patwari
Kamal Nath, Jitu PatwariSarkarnama

Kamal Nath News : कमलनाथ काँग्रेसला पाडणार भगदाड? प्रदेशाध्यक्षांची आमदारांना फोनाफोनी

Jitu Patwari : कमलनाथ यांच्यासोबत काँग्रेसमधील 12 आमदार तसेच माजी आमदार भाजपमध्ये जाण्याची जोरदार चर्चा आहे.
Published on

Madhya Pradesh News : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. खासदार मुलासह जवळपास बारा आमदार तसेच माजी आमदारांना सोबत घेऊन ते काँग्रेसला भगदाड पाडणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी या चर्चा फेटाळून लावल्या असल्या तरी आता थेट त्यांनी आमदारांना फोनाफोनी सुरू केल्याचे समजते. (Kamal Nath News)

कमलनाथ यांनी शनिवारी दिल्ली गाठल्यानंतर त्यांच्या भाजप (BJP) प्रवेशाबाबत चर्चांना उधाण आले. त्यातच नुकलनाथ यांनी आपल्या एक्स हँडलवरून काँग्रेसचा (Congress) उल्लेख हटवल्यानंतर त्यात अधिकच भर पडली. तर भाजपच्या एका प्रवक्त्याने कमलनाथ व नुकलनाथ यांच्यासह इतर नेत्यांचे फोटो ट्विट करत जय श्रीराम म्हटले. या घडामोडींमध्ये काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.

Kamal Nath, Jitu Patwari
Jharkhand Politics : मोठी बातमी ! झारखंडमधील चंपई सोरेन सरकार संकटात; 12 आमदार बंडाच्या तयारीत

कमलनाथ यांच्यासोबत 12 आमदार आणि काही माजी आमदार तसेच पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी चर्चा आहे. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी यांनी या चर्चा आधारहीन असल्याचे सांगितले. मात्र, दुसरीकडे त्यांच्याकडून काँग्रेसच्या आमदारांना (MLA) फोनाफोनी सुरू असल्याचे वृत्त आहे. कमलनाथ भाजपमध्ये गेले तरी काँग्रेसला खिंडार पडू नये, यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पटवारी म्हणाले, कमलनाथ हे भाजपमध्ये प्रवेश करतील, असा विचार मी स्वप्नातही करू शकत नाही. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी कमलनाथ हे पहिल्यांदा 1980 मध्ये निवडणुकीत उतरले तेव्हा ते आपले तिसरे पूत्र असल्याचे म्हटले होते. संजय गांधी आणि त्यांची अतुट मैत्री होती. ते 1970 पासून काँग्रेसमध्ये आहेत.

दरम्यान, काही महिन्यांपुर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ 66 जागांवर समाधान मानावे लागले होते. तर भाजपला तब्बल 163 जागा मिळाल्या. 2018 च्या निवडणुकीत काँग्रेसला 114 जागा मिळाल्या होत्या. मागील वर्षीच्या निवडणुकीतील दारूण पराभवानंतर कमलनाथ यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यात आले. तेव्हापासून ते नाराज असल्याची चर्चा आहे.

Kamal Nath, Jitu Patwari
Rahul Gandhi : अचानक असे काय झाले ? भारत जोडो न्याय यात्रा स्थगित

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com