Russia Ukraine War News Sarkarnama :Russia Ukraine War News
देश

युक्रेनमधील युद्ध तात्पुरतं थांबलं! रशियाची अखेर मोठी घोषणा

रशियाने युक्रेनच्या शहरांवरील हल्ले थांबवले असून, तेथील नागरिकांना बाहेर पडता येणार आहे.

सरकारनामा ब्युरो

किव्ह : युक्रेनवर (Ukraine) आक्रमण केल्यानंतर रशियाने (Russia) आता युद्धाबाबत मोठी घोषणा केली आहे. रशियाने मरिऊपोल आणि व्होल्नोव्हाखा या शहरांत शस्त्रसंधी (Ceasefire) जाहीर केली आहे. जखमींवर उपचारासह युद्धग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांना तेथून बाहेर पडण्यासाठी काही काळ युद्ध थांबवण्यात आले आहे. मानवतावादी दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आल्याचे रशियाने म्हटले आहे.

आता रशियाने शस्त्रसंधीची घोषणा केली आहे. रशियाने या शहरांवरील हल्ले थांबवले असून, तेथील नागरिकांना बाहेर पडता येणार आहे. तसेच, जखमींनाही तेथून उपचारासाठी बाहेर काढण्यासाठी वेळ मिळणार आहे. दरम्यान, रशिया आणि युक्रेनमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. रशियाच्या सैन्याने मरिऊपोल या शहराला वेढा घातला आहे. हे शहर युक्रेनमधील एक प्रमुख बंदर आहे. या शहराच्या महापौरांनीच शस्त्रसंधीचे आवाहन केले होते. रशियाच्या सैन्याने राजधानी किव्हसह इतर मोठ्या शहरांवर बॉम्बहल्ले सुरू ठेवले आहेत.

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यांत शेकडो निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या खारकिव्हवर रशियाने हल्ले सुरु ठेवले आहेत. याचरोबर किव्ह शहरात रोजच रशियाकडून बाँबहल्ले सुरू आहेत. याचबरोबर क्षेपणास्त्र हल्लेही होत आहेत. युद्धाच्या भीतीने एकाच आठवड्यात युक्रेनमधील सुमारे दहा लाख नागरिकांनी स्थलांतर केले आहे. या स्थलांतरितांचा लोंढा शेजारील देशांमध्ये धडकत आहे. युक्रेनमधील स्थलांतर हे अत्यंत मोठ्या संख्येने झालेले या शतकातील हे सर्वांत वेगवान स्थलांतर असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) म्हटले आहे. (Russia-Ukraine War Updates)

भारतावर निर्बंधांचे अमेरिकेचे संकेत

भारताने रशियाकडून एस-400 ट्रायम्फ ही मिसाईल संरक्षण प्रणाली खरेदी केली आहे. रशियाशी संरक्षण खरेदी व्यवहार केल्याने भारतावर निर्बंध घालण्याचा अमेरिकेचा विचार सुरू आहे. यातच आता रशियाने युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारले असून, रशियाशी व्यवहार करणाऱ्या देशांवर अमेरिका निर्बंध घालत आहे. संयुक्त राष्ट्रांत रशियाच्या विरोधात ठराव मांडण्यात आल्यानंतर भारताने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. यामुळेही अमेरिकेने भारतावर निर्बंध घालण्याबाबत गंभीरपणे विचार सुरू केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT