धक्कादायक : रशियन सैनिक सैरभैर; आपल्याच वाहनांचे नुकसान करताहेत..रडताहेत..

युक्रेनमधील युद्धात रशियाच्या सैनिकांचै अन्नपाण्याविना हाल सुरू असल्याचे समोर आले आहे.
Russian troops in Ukraine
Russian troops in Ukraine Sarkarnama

किव्ह : युक्रेनवर (Ukraine) आक्रमण केल्यामुळे रशियाच्या (Russia) जागतिक पातळीवर रशियाची कोंडी सुरू आहे. रशियावर आर्थिक निर्बंध लादण्यात आल्याचा परिणाम रशियाने युक्रेनविरुद्द पुकारलेल्या युद्धावर आहे. रशियन सैनिकांना खाण्यापिण्यासाठी काही नसल्याचे समोर येत आहे. युद्धाला नेमकी दिशा नसल्याने सैरभैर झालेले रशियन सैनिक आपल्याच वाहनांचे नुकसान करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनीच ही माहिती उघड केली आहे. युक्रेनच्या युद्धात रशियन सैनिकांना पुरेसा अन्नपुरवठा होत नाही. यातच इंधनाचा पुरवठाही अपुरा आहे. यामुळे सैनिकांचे मनोबल कमी झाले आहे. यातच त्यांना दिसेल त्याला गोळी घालण्याचे आदेश आहेत. त्यामुळे सैनिक सैरभैर झाले आहेत. ते सैन्याच्या वाहनांची मोडतोड करून पुढे युद्ध करण्यासाठी जाणे टाळत आहेत. अनेक सैनिक नैराश्यग्रस्त होऊन रडताना दिसत आहेत.

Russian troops in Ukraine
रशियाच्या युद्धामुळं भारत अडचणीत? अमेरिकेचे निर्बंध लादण्याचे संकेत

युक्रेनने पकडलेल्या काही रशियन सैनिकांनीच रशियन सैन्याच्या परिस्थितीबद्दल माहिती दिली आहे. रशियाचे युक्रेनमधील युद्ध 9 दिवसांपासून सुरू आहे. यात रशियाच्या सैन्याची मोठी हानी झाली आहे. रशियन सैन्याचे मनोबल खचल्याने रशियाच्या अडणीत वाढ झाली आहे. यामुळे रशियन सैन्याचे युक्रेनमध्ये आगेकूच करण्याचा वेग खूपच मंदावलेला आहे. रशियाने आखलेल्या मोहिमेच्या तुलनेत अपेक्षेपेक्षा जास्त वेळ रशियन सैन्याला पुढे सरकण्यास लागत आहे. यामागे सैन्यातील नैराश्याचे वातावरणही कारणीभूत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Russian troops in Ukraine
एकाच आठवड्यात तीन वेळा युक्रेनच्या अध्यक्षांच्या हत्येचा कट पण...

युद्धात 350 नागरिकांचा मृत्यू

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यांत आतापर्यंत सुमारे 350 निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे, असा दावा युक्रेन सरकारने केला आहे. युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या खारकिव्हवर रशियाने हल्ले सुरु ठेवले आहेत. याचरोबर किव्ह शहरात रोजच रशियाकडून बाँबहल्ले सुरू आहेत. याचबरोबर क्षेपणास्त्र हल्लेही होत आहेत. युद्धाच्या भीतीने एकाच आठवड्यात युक्रेनमधील सुमारे दहा लाख नागरिकांनी स्थलांतर केले आहे. या स्थलांतरितांचा लोंढा शेजारील देशांमध्ये धडकत आहे. युक्रेनमधील स्थलांतर हे अत्यंत मोठ्या संख्येने झालेले या शतकातील हे सर्वांत वेगवान स्थलांतर असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) म्हटले आहे. (Russia-Ukraine War Updates)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com