New Delhi News: काही दिवसांपूर्वीच रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन हे भारताच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी भारत आणि रशियामध्ये अनेक महत्त्वाचे करार झाले. पण त्यानंतर पुतीन यांच्या निवासस्थानावर दीर्घ पल्ल्याचे ड्रोन्स सोडत हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, तो सफल झाला नाही.या हल्ल्यानंतर काही तासांतच रशियानं (Russia)भारतासाठी मोठी घोषणा केली आहे. यामुळे पाकिस्तानची झोप उडणार आहे.
रशिया भारतासाठी मोठा निर्णय़ घेण्य़ाच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.ऑपरेशन सिंदूरनंतर भारतानं आक्रमक धोरण स्विकारताना तीनही सैन्यदल मजबूत करण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. याचदरम्यान, आता रशियानं मित्र भारताला S-350 वित्याज हवाई संरक्षण प्रणाली देण्यास तयारी दर्शवली असल्याची माहिती समोर येत आहे.
भारताला रशिया S-350 वित्याज हवाई संरक्षण प्रणालीच उपलब्ध करून देणार नसून त्यासंबंधीचं तंत्रज्ञानही सोपवणार आहे. रशियाचं या निर्णय मदतीनं भारताचं (India) हवाई दल अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या दणक्यानंतर भारत अन् रशियात चांगलीच जवळीक वाढली आहे.
रशियानं जर भारताला S-350 वित्याज हवाई संरक्षण प्रणाली उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला,तर जागतिक पातळीवर त्याचा फार मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. महत्वाची बाब म्हणजे S-350 वित्याज या ताकदवान हवाई संरक्षण प्रणालीमुळे अमेरिका आणि पाकिस्तानची झोप उडण्याची शक्यता आहे. रशियाकडून भारताला या हवाई संरक्षण प्रणालीचं तंत्रज्ञान मिळाल्यानंतर तिचे काही पार्ट हे आपल्या देशात तयार करता येणार आहे.
अमेरिकेसाठी रशिया आणि भारतामध्ये वाढत असलेला मैत्रीचा धागा तापदायक ठरत आहे. रशिया आणि भारतामध्ये जवळीक वाढू नये,असं अमेरिकेला वाटतं,मात्र अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफनंतर रशिया आणि भारताची जवळीक आता आणखी वाढली असून,रशियाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे.रशियाकडून भारताला हवाई संरक्षण प्रणाली मिळणार आहे.पुतिन यांच्या दौऱ्यानंतर ही मोठी घोषणा करण्यात आली आहे
काही दिवसांपूर्वीच रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन हे भारताच्या दौऱ्यावर आले होते.यावेळी भारत आणि रशियामध्ये मैत्रीचं नव पर्व सुरू झाल्याचं समोर आलं होतं.यावेळी दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वाचे करारही करण्यात आले होते. तसेच पुतीन यांनी यावेळी भारताला कच्च्या तेलाची कधीही कमी पडू देणार नाही असं ठणकावून सांगितलं होतं. यामुळे अमेरिकेचा प्रचंड मोठा संताप झाल्याचं दिसून आलं होतं. ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्यापाठीमागं हेही एक प्रमुख कारण होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.