

Ahilyanagar Shrirampur news : पुणे इथल्या जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या बॉम्बस्फोटामधील आरोपींना शस्त्र पुरविल्याच्या आरोप असलेला असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागीरदार (रा. वार्ड नंबर 2, ता. श्रीरामपूर) याच्यावर आज श्रीरामपूरमध्ये दिवसाढवळ्या बेधुंद गोळीबार झाला.
यात बंटी जहागीरदार गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर श्रीरामपूर इथल्या कामगार हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जखमी बंटी जहागीरदार याचे वैद्यकीय बुलेटिन समोर आलेले नाही. त्यामुळे श्रीरामपूरमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
बंटी जहागीरदार हा कब्रस्तानातून बाहेर पडला होता. त्यावेळी श्रीरामपूर (Shrirampur) शहरातील जर्मन हॉस्पिटलसमोरील मुख्य दरवाखाजवळ दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक गोळ्या झाडल्या. गोळीबाराचा आवाज होताच परिसरात एकच पळापळ झाली. हल्ला केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. गोळीबारानंतर परिसरात पळापळ झाली असून, शहरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी शहरात बंदोबस्त वाढवला आहे.
गोळीबारात जखमी झालेल्या बंटी जहागीरदार याला तातडीने उपचारासाठी कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर वैद्यकीय पथकाकडून उपचार सुरू असून प्रकृतीबाबत वैद्यकीय पथकाने अजून कोणतीही अपडेट दिलेली नाही. पोलिसांनी (Police) घटनास्थळी भेट दिली असून, पंचनामा केला आहे.
बंटी जहागीरदार याच्या दिशेने बेधुंद गोळीबार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यात सुमारे सातच्या आसपास गोळ्या झाडल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून काही रिकामं काडतुस जप्त केली आहे. परंतु नेमक्या किती गोळ्या झाडल्या, याबाबत पोलिसांकडून पुष्टी करण्यात आलेली नाही.
हल्लेखोर दबा धरून बसले होते. बंटी जहागीरदार दुचाकीवरून येताच, त्याच्यावर गोळीबार सुरू केला. त्यामुळे हा हल्ला पूर्वनियोजित होता, असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर येत आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून हल्ल्याचे चित्रीकरण मिळवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहे.
श्रीरामपूर पोलिसांनी हल्ल्यातील आरोपींच्या शोधासाठी पथक देखील रवाना केलं आहे. तसंच स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी समांतर तपास सुरू केला आहे. श्रीरामपूरसह अहिल्यानगर जिल्ह्यातील संवेदनशील भागात फिक्स पाॅईंट वाढवण्यात आले आहे. श्रीरामपूरमध्ये नाका बंदी वाढवण्यात आली संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.