कीव्ह : रशियाने आक्रमण केल्यानंतर आठवडाभरात युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांना ठार मारण्याचा प्रयत्न तीन वेळा करण्यात आला. या हल्ल्यांतून तिन्ही वेळा झेलेन्स्की बचावले आहेत. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी आधीच सावधगिरी बाळगल्याने हे कट उधळून लावण्यात यश आले आहे. रशियाने झेलेन्स्की यांच्या हत्येसाठी वॅगनर ही भाडोत्री टोळी व चेचेन बंडखोरांना पाठवले होते.
व्होलोदिमीर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांना ठार मारण्यासाठी चेचेन बंडखोरांच्या विशेष दलाच्या कादिरोव्हिट्स या गटाला पाठविण्यात आले होते. या गटाचा खातमा केल्याचा दावा युक्रेनच्या नॅशनल सिक्युरिटी अँड डिफेन्स कौन्सिलचे सचिव ओलेस्की डॅनिलोव्ह यांनी केला आहे. अध्यक्षांना मारण्यासाठी पाठवलेल्या चेचेनच्या विशेष दलातील बंडखोरांना किव्हजवळील भागात ठार करण्यात आले. रशियन गुप्तहेर संघटनेच्या काही अधिकाऱ्यांकडूनच युक्रेनला या कटांची मिळाली होती, हेही समोर आले आहे.
रशियाने युक्रेनविरुद्ध पुकारलेल्या युद्धाला रशियाच्या गुप्तहेर संघटनांमधील काही अधिकाऱ्यांचा विरोध आहे. त्यांच्याकडूनच झेलेन्स्की यांना ठार मारण्याच्या कटांची माहिती युक्रेनला मिळत होती. यानुसार रशियन वॅगनर या भाडोत्री हल्लेखोरांच्या हालचालींचा अंदाज युक्रेनने घेतला होता. झेलेन्स्कीच्या सुरक्षा पथकाला याबद्दल अचूक माहिती मिळत होती. युक्रेनमध्ये युद्ध सुरू होण्याआधी झेलेन्स्की यांनी तेथून बाहेर काढण्याची तयारी अमेरिकेने दर्शविली होती. पण त्यांनी याला नकार देत किव्हमध्येच थांबण्याचा निर्णय घेतला होता. (Russia-Ukrain War Updates)
दरम्यान, युरोपातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्पावर शुक्रवारी रशियानं (Russia) कब्जा मिळवला आहे. हा प्रकल्प युक्रेनमधील (Ukraine) झेपोरीयझिया भागात असून देशातील चार प्रकल्पांपैकी सर्वात मोठा आहे. या भागात सकाळी रशियाकडून जोरदार बॉम्बहल्ला करण्यात आला होता. त्यापाठोपाठ रशियन सैन्यानं हा प्रकल्प ताब्यात घेतल्यानं युक्रेनला मोठा धक्का बसला आहे. याच प्रकल्पाला सकाळी आग लागल्याचे वृत्त होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.