राज्यपालांची माघार! सरकारसमोर घेतलं अखेर एक पाऊल मागे

राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार हा संघर्ष आता टोकाला पोचला असून, राजकीय वातावरण तापले आहे.
Jagdeep Dhankhar
Jagdeep Dhankharsarkarnama
Published on
Updated on

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि राज्यपाल जगदीप धनखर (Jagdeep Dhankhar) यांच्यात संघर्ष सुरु झाला. यामुळे राज्यपालांनी विधानसभेचे अधिवेशन (Assembly Session) विधानसभेचे अधिवेशन चक्क मध्यरात्री 2 वाजताच बोलावले होते. अखेर राज्यपालांनी माघार घेत मंत्रिमंडळाच्या नव्या प्रस्तावावर मोहोर उमटवली आहे. यामुळे अधिवेशन दुपारी 2 वाजता होणार आहे.

राज्यपालांनी विधानसभेचे अधिवेशन मध्यरात्री 2 वाजता बोलावण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. मंत्रिमंडळाने पाठवलेल्या प्रस्तावात दुपार ऐवजी पहाटे दोनची वेळी चुकून पडली होती. राज्यपालांनी या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर तो निर्णय मागे घेण्यास नकार दिला होता. यानंतर मंत्रिमंडळाने राज्यपालांना पुन्हा सुधारित प्रस्ताव पाठवला होता. यावर राज्यपालांनी मुख्य सचिव हरीकृष्ण द्विवेदी यांना राजभवनावर बोलावून त्यांच्याशी चर्चा केली होती. यानंतर अखेर राज्यपालांनी आता 7 मार्चला दुपारी 2 वाजता विधानसभा अधिवेशन बोलावण्याच्या सुधारित प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

Jagdeep Dhankhar
राज्यपालांनी दिली हुलकावणी! आले हेलिकॉप्टरने अन्‌ गेले वाहनातून

पश्चिम बंगाल सरकारने विधानसभेचे अधिवेशन बोलवण्यासाठी राज्यपालांना समंतीसाठी प्रस्ताव पाठवला होता. त्या प्रस्तावामध्ये टायपिंगच्या चुकीमुळे 7 मार्च रोजी 2 पीएमऐवजी 2 एम असे टाईप करण्यात आले होते. त्या प्रस्तावाला राज्यपालांनी मंजुरी दिली होती. त्यामुळे विधानसभेचे अधिवेशन 7 मार्चला मध्यरात्री 2 वाजता होणार होते. यानंतर राज्यपालांनी ट्विट करून मंत्रिमंडळाच्या प्रस्तावाला परवानगी दिल्याचे सांगितले होते. मात्र, रात्री दोन वाजता अधिवेशन सुरू करण्याचा हा प्रस्ताव त्यांना अनैसर्गिक वाटत होता, असेही त्यांनी म्हटले आहे.

Jagdeep Dhankhar
डाव्यांचं जोरदार कमबॅक! मतांच्या टक्केवारीत भाजपसह काँग्रेसलाही टाकलं मागं

पश्चिम बंगाल विधानसभेचे कामकाज पहाटे 2:00 वाजता सुरू झाले, तर देशातील अशा प्रकारची ही एक अनोखी घटना असेल, असेही राज्यपालांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. मंत्रिमंडळाचा प्रस्ताव स्वीकारताना राज्यपाल यांनी राज्यघटनेचे कलम 174 अन्वये सोमवारी म्हणजेच 7 मार्च रोजी पहाटे 2 वाजता (2 AM) राज्य विधानसभेचे अधिवेशन बोलावले असल्याचे राजभवनाच्या वतीने सांगण्यात आले होते. यावर विधानसभा अध्यक्ष विमान बॅनर्जी यांनी म्हटले होते की, ही टायपिंगची चूक आहे. राज्यपालांना ती चुक दुरुस्त करता आली असती. राज्य सरकारने पाठवलेल्या पहिल्या दोन नोट्समध्ये ते दुपारी 2:00 वाजता लिहिले होते. मात्र, त्या ठिकाणी चुकीने पहाटे 2:00 पर्यंत झाले. राज्यपाल त्याकडे दुर्लक्ष करू शकले असते. पण त्यांनी तसे केले नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

CJP spokesperson Saurabh Das, JP Nadda
DK Shivakumar
CJP Protest _Bharat Banait from Nagpur hits by Delhi Police
Mamata Banerjee
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com