Vladimir Putin News Sarkarnama
देश

Vladimir Putin News : राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना हृदयविकाराचा झटका; 'ही' धक्कादायक माहिती समोर

Deepak Kulkarni

Russia President Vladimir Putin News : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर येत आहे. या हार्ट अटॅकनंतर पुतिन बेडरूममध्ये खाली जमिनीवर कोसळले. त्यांच्या सुरक्षा अधिकाऱ्याने पुतिन यांना जमिनीवर बेशुद्धावस्थेत पाहिल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. टेलिग्राम ग्रुपसह ब्रिटनमधील अनेक इंग्रजी वर्तमानपत्रांनी यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

'टेलिग्राम' चॅनलच्या दाव्यानुसार राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांना रविवारी त्यांच्या मॉस्को येथील खासगी अपार्टमेंटमध्ये हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती उघडकीस आली आहे. पुतिन रविवारी रात्री 9 वाजून 5 मिनिटांच्या सुमारास बेडरूममधील जमिनीवर खाली पडलेले होते. जेव्हा सुरक्षा कर्मचाऱ्यांनी खाली जमिनीवर काहीतरी पडल्याचा आवाज ऐकला तेव्हा ते धावत आल्यानंतर हा प्रकार समोर आला .(Russia)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सुरक्षा अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिल्यानंतर बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या पुतिन यांच्यावर उपचार करण्यासाठी पावले उचलण्यात आली. तत्काळ डॉक्टरांना पाचारण करण्यात आले आणि नंतर डॉक्टरांनी पुतिन यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं निदान केलं.रशियामधील निवृत्त गुप्तचर अधिकारी आणि क्रेमिलनमधील अधिकाऱ्यांकडून आपण ही माहिती मिळवतो, असा त्यांचा दावा आहे. (Heart Attack)

राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्यावर तत्काळ उपचार करण्यात आले. ही घटना 22 ऑक्टोबर रोजी घडल्याचं सांगितलं जात आहे. पुतिन यांना त्यांच्या निवासस्थानी असलेल्या एका विशेष वैद्यकीय सुविधा असलेल्या आयसीयूमध्ये हलविण्यात आल्याची माहितीही समोर येत आहे.

रशियातील बंड थोपवण्यात पुतिन यांना यश

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या जवळचे असलेले झिबिग्नी प्रिगोझिव्ह यांनी बंड केले होते. मात्र, हे बंड पेल्यातील वादळ ठरले आहे. पुतिन यांना हे बंड थोपवण्यामध्ये यश आले आहे. वॅग्नर ग्रुपचे सैनिक रशियातील वेगवेगळी शहर ताब्यात घेतल्याचा दावा करत होते. मात्र, बेलारुसच्या राष्ट्राध्यक्षांच्या मध्यस्थीने तोडगा निघाला.

या बंडामध्ये जे जे गुंतले असतील, त्या सर्वांना शिक्षा करण्याची आक्रमक भाषा पुतिन यांनी घेतली होती. वॅग्नर ग्रुप आणि पुतिन यांच्यामध्ये तहामध्ये झाला. या तहामध्ये पुतिन यांनीही काहीशी मवाळ भूमिका घेतली. बंड करणाऱ्या वॅग्नर ग्रुपला किंवा त्या ग्रुपचा प्रमुख प्रिगोझिनला देशद्रोह किंवा कायदेशीर कारवाईपासून अभय देण्यास पुतिन यांनी मान्यता दिली.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT