Narendra Modi, Vladimir Putin Sarkarnama
देश

Narendra Modi in Russia : रशियाच्या दौऱ्यात मोदींना पहिलं मोठं यश; ‘चाय पे चर्चा’ अन् ‘तो’ निर्णय...

Moscow Russia President Vladimir Putin : रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना घरी निमंत्रित केले होते. यावेळी मोदींनी रशियन लष्करातील भारतीयांचा मुद्दा उपस्थित केला.

Rajanand More

New Delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदींना रशिया दौऱ्यात पहिलं मोठं यश मिळालं आहे. रशियन लष्करात काम करणाऱ्या भारतीयांना देशवापसी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पंतप्रधान मोदींनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांना भेटल्यानंतर हा मुद्दा उपस्थित केला होता.

पुतिन यांनी मोदींची मागणी मान्य करत रशियन लष्करातील भारतीयांना मुक्त करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पुतिन यांनी मोदींना त्यांच्या घरी निमंत्रित केले होते. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान मोदींनी भारतीयांना मुक्त करण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता.

मोदी सोमवारी रशियामध्ये दाखल झाले आहेत. त्यानंतर पुतिन आणि मोदींमध्ये अनौपचारिक बैठक झाली. या बैठकीत पुतिन यांनी मोदींना पुन्हा पंतप्रधान झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. मागील पाच वर्षांतील मोदींचा हा पहिलाच रशिया दौरा आहे. या दौऱ्यात ते 22 व्या भारत-रशिया वार्षिक शिखर बैठकीत सहभागी होणार आहेत.

दरम्यान, रशियन लष्करामध्ये सध्या 30 ते 40 भारतीय असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे म्हणणे आहे. या भारतीया मायदेशी परत यायचे आहे. मात्र, रशियन लष्कर सोडून परत येणे कठीण असल्याने ते अडकून पडले आहेत. काँग्रेसनेही हा मुद्दा उपस्थित केला होता. भारताकडूनही अनेक प्रयत्न करण्यात आले होते. पण रशियाकडून कोणतेही आश्वासन मिळाले होते.

त्यामुळे मोदींच्या दौऱ्यादरम्यान या भारतीयांची मायदेशी सुरक्षित वापसीचा मुद्दा महत्वाचा बनला होता. युक्रेन आणि रशियातील युध्दादरम्यान आतापर्यंत दोन भारतीयांचा मृत्यू झाला आहे. आता रशियाने भारतीयांना मुक्त करण्याबाबत सहमती दर्शवल्याने मोदींच्या दौऱ्याला मोठे यश मिळाल्याचे मानले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT