BJP MP's Rally : खासदारकी जिंकली अन्‌ दारू वाटून आनंदोत्सव साजरा केला; भाजप खासदाराच्या सभेतील व्हिडिओ व्हायरल

Karnataka Politics : कर्नाटकच्या चिकबळ्ळापूर लोकसभा मतदारसंघातून माजी मंत्री के. सुधाकर हे निवडून आले आहेत. के. सुधाकर यांनी काँग्रेसच्या रक्षा रामय्या यांचा एक लाख 63 हजार मतांनी पराभव केला आहे.
BJP MP's Rally
BJP MP's RallySarkarnama
Published on
Updated on

Bangalore, 09 July : लोकसभा निवडणुकीतील विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत नागरिकांना दारूच्या बाटल्यांचे वाटप केल्याचे समोर आले आहे. त्याबाबतचा व्हिडिओ व्हायरल होत असून या प्रकरणावरून काँग्रेसने भाजपवर सडकून टीका केली आहे. या प्रकारामुळे कर्नाटकाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

कर्नाटकच्या (Karnataka) चिकबळ्ळापूर लोकसभा मतदारसंघातून माजी मंत्री के. सुधाकर (K. Sudhakar) हे निवडून आले आहेत. के. सुधाकर यांनी काँग्रेसच्या रक्षा रामय्या यांचा एक लाख 63 हजार मतांनी पराभव केला आहे. त्या निवडणुकीतील विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी नेलमंगल येथे नुकतेच भाजपच्या वतीने जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला खासदार के. सुधाकर यांच्यासह विरोधी पक्षनेते आर. अशोक आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेतेही उपस्थित होते मात्र या दारू वाटपाच्या कार्यक्रमावर त्यांनी कुठलाही शब्द काढलेला नाही. काँग्रेसने (Congress) मात्र या कार्यक्रमावर जाहीरपणे सडकून टीका केली असून भाजपला काही सवाल केले आहेत.

या सभेच्या बाजूला असलेल्या व्हिडिओमध्ये दारूची पाकिटे आणि बाटल्या दिले जात असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे पोलिस कर्मचाऱ्यांच्या उपस्थित लोकांनी दारू घेण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. त्या वेळी उपस्थित असलेल्या पोलिसांनीही या कार्यक्रमावर आक्षेप कसा घेतला नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

BJP MP's Rally
Rohit Patil : रोहित पाटलांना शरद पवारांची 'पॉवर'; विधानसभेच्या आखाड्यात उतरवण्याचे संकेत

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री डी. के‌. शिवकुमार यांनी या प्रकारावरून भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना प्रश्न केला असून खासदाराला दारू वाटण्याची परवानगी कशी दिली, असा सवाल त्यांनी केला आहे.

या प्रश्नाचे उत्तर जे. पी. नड्डा यांनी द्यायला पाहिजे. तुमचा पक्ष सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दारूचे वाटप करून संस्कृती कशी टिकून ठेवत आहे, असा सवालही डी. के. शिवकुमार यांनी केला आहे. या प्रश्नाचे उत्तर स्थानिक नेत्यांपेक्षा भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी दिले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

जाहीर सभेत दारूवाटप केल्या प्रकरणी गुन्हा नोंदवणे ही वेगळी बाब आहे. पण, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून या प्रकरणाची उत्तरे दिली पाहिजेत, अशी अपेक्षाही शिवकुमार यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, भाजपचे (BJP) नेलमंगलचे अध्यक्ष जगदीश चौधरी यांनी 3 जुलै रोजी स्थानिक पोलिसांना पत्र लिहून या कार्यक्रमाची परवानगी घेतली होती. त्या पत्रात ‘कार्यक्रमात खाणे आणि दारूची व्यवस्था असेल’ असेही म्हटले होते, त्यामुळे पोलिसांनी दारू वाटपाला सार्वजनिक ठिकाणच्या जाहीर सभेत परवानगी कशी दिली, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

पोलिसांची फक्त बंदोबस्ताची भूमिका : सी. के. बाबा

या संदर्भात बेंगळुरू ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सी. के. बाबा यांनी सांगितले, अबकारी विभागाने याला परवानगी दिली आणि पोलिसांना बंदोबस्ताची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यात गृहविभागाची कोणताही भूमिका नाही, परवानगी देण्याची जबाबदारी उत्पादन शुल्क विभागाची आहे.

BJP MP's Rally
Karmala Politics : सुभाषबापूंनी महायुतीत ठिणगी टाकली; संजय शिंदेंच्या करमाळ्यातून भाजपचा आमदार करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com