कीव : रशिया (Russia)आणि युक्रेनमधील युद्धामुळे शिक्षणासाठी युक्रेमध्ये (Ukraine)असणारे देशातील अनेक विद्यार्थी तेथे अडकले आहेत. युध्दामुळे तेथील विमान सेवा रद्द करण्यात आली आहे. याठिकाणी एमबीबीएसच्या शिक्षणासाठी गेलेले शेकडो भारतीय विद्यार्थी अडचणीत आले आहेत. युक्रेनमधून २७०च्यावर भारतीय विद्यार्थ्यांना रोमानियात हलवले आहे. ते दोन दिवसात भारतात येणार आहेत.
यात अमरावती जिल्ह्यातील आठ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मात्र युक्रेन मधील भारतीय दूतावास व भारत सरकारने तातडीने पावले उचलत युक्रेनच्या चर्नोव्हस्की व आसपासच्या भागातील २७० च्यावर विद्यार्थ्याना युक्रेनला लागूनच असलेल्या रोमानिया या देशात नेले आहे. रोमानियाच्या बोर्डर वर रोमानियन जनतेने भारतीय विद्यार्थ्यांना जेवणाची सुद्धा सोय केली आहे.
अमरावती येथील साहिर तेलंग म्हणाला, ''भारत सरकारने तातडीने पावले उचलल्याने व सर्व विद्यार्थ्यांची युक्रेनवरून आणण्याची मोफत व्यवस्था करण्यात आल्याने भारत सरकार व युक्रेनमधील भारतीय दूतावासाचे आम्ही आभारी आहोत. उद्या किंवा परवा आम्हाला भारतात आणले जाणार आहे,''
युक्रेनवरुन कऱ्हाडला परतलेला विरवडे येथील आशीष वीर म्हणाला, ''युक्रेनमधील युध्दाजन्य परिस्थिती असलल्या भागात सध्या वीज बंद आहे, नेटवर्क बंद आहे. त्यामुळे संपर्कच होत नाही. आम्ही राहत होतो तेथुन काही अंतरावर बॉम्बस्फोट सुरु होते. आम्हालाही बॉम्बस्फोट सुरु झाल्यावर बंकरमध्ये बसण्याच्या सुचना दिल्या होत्या. मात्र खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्रामुळे सुदैवाने मला विमान मिळून मी भारतात परतलो आहे.
गुरुवारी रशियाने केलेल्या हल्ल्यात युक्रेनमधील ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. रशियापासून मला व माझ्या कुटुंबियांच्या जीवाला धोका असल्याचे युक्रेनचे अध्यक्ष वलोडिमिर जेलेंस्की यांनी व्हिडओच्या माध्यमातून सांगितले आहे. माझी हत्या करण्याचा रशियाचा कट असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
वलोडिमिर जेलेंस्की म्हणाले, ''रशियाच्या रडारवर सर्वात आधी मी आहे, त्यानंतर माझा परिवार आहे. जिवाला धोका असल्याचे माझा परिवारातील सर्व जण लपून बसले आहेत. माझी हत्या करुन युक्रेनला राजनैतिक दृष्ट्या नष्ट करण्याचा रशिया डाव आहे,'' (Russia Ukraine War News updates)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.