लवकर सुटका करा..विद्यार्थ्यांची सरकारला आर्त साद, मायदेशी येण्याची आस!

तीन ते चार हजार विद्यार्थी सध्या आमच्या बंकरमध्ये वास्तव्यास आहेत. दोन-तीन दिवस पुरेल एवढेच अन्न आहे. अजुन किती दिवस आम्हाला येथे बसवतील हे सांगता येत नाही.
Russia Ukraine War
Russia Ukraine War sarkarnama
Published on
Updated on

-हेमंत पवार

कऱ्हाड : ''सरकारने लवकर काहीतरी करुन आमची सुटका करावी..'' अशी आर्त साद युक्रेन येथे अडकलेल्या कऱ्हाड (kahad)(जि.सातारा) येथील प्रतिक्षा अरबुणे या एमबीबीएसच्या विद्यार्थीनीने 'सरकारनामा' शी बोलताना मोदी सरकारला घातली आहे.

युक्रेनमधील (Ukraine)आमच्या होस्टेलच्या परिसरातील काही ठिकाणी बॉम्बचा वर्षाव सुरु झाल्यामुळे आम्हाला बंकरमध्ये बसवले आहे. तीन ते चार हजार विद्यार्थी सध्या आमच्या बंकरमध्ये वास्तव्यास आहेत. दोन-तीन दिवस पुरेल एवढेच अन्न आहे. अजुन किती दिवस आम्हाला येथे बसवतील हे सांगता येत नाही. अनेक ठिकाणची वीज, नेटवर्कही गेले आहे. त्यामुळे आम्हाला काळजी वाटतेयं, असे अरबुणे म्हणाली.

रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे शिक्षणासाठी युक्रेमध्ये असणारे देशातील अनेक विद्यार्थी तेथे अडकले आहेत. युध्दामुळे तेथील विमान सेवा रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, याचा सर्वाधिक फटका युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थांना बसला आहे.विमान सेवा बंद असल्यामुळे जवळपास 18 हजारहून अधिक भारतीय नागरिक, विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. हंगेरी, पोलंड, रोमानियासह अनेक देशांमार्गे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान तेथे हल्ले सुरु झाल्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना बंकरमध्ये बसवण्यात आले आहे.

प्रतिक्षा अरबुणे म्हणाली, ''मी युक्रेनमध्ये एमबीबीएसच्या पाचव्या वर्षाला आहे. आम्ही ज्या परिसरातील राहतो त्या होस्टेलच्या परिसरातील काही ठिकाणी बॉम्बचा वर्षाव सुरु झाल्यामुळे आम्हाला बंकरमध्ये वास्तव्यासाठी आणण्यात आले आहे. देशातील तीन ते चार हजार विद्यार्थी आमच्या बंकरमध्ये वास्तव्यास आहेत. आम्हाला बंकरमध्येही बॉम्बचे आवाज ऐकू येत आहेत. होस्टेलच्या कमांडटनी आमची खाण्याची व्यवस्था केली आहे. अजुन किती दिवस आम्हाला येथे बसावे लागेल सांगता येत नाही. त्यातच मात्र दोन-तीन दिवस पुरेल एवढेच अन्न सध्या शिल्लक आहे, असे सांगीतले जात आहे. युध्यामुळे अनेक ठिकाणची वीज, नेटवर्कही गेले आहे. आम्हाला कधी येथून बाहेर पडायला मिळेल सांगता येत नाही. आम्हाला खुपच काळजी वाटु लागली आहे. त्यामुळे सरकाराने लवकर काहीतरी करुन आम्हाला भारतात न्यावे,''

Russia Ukraine War
माझी हत्या करण्याचा रशियाचा कट ; युक्रेनच्या राष्ट्रपतींचा भावुक व्हिडिओ व्हायरल

 दरम्यान युक्रेनवरुन आजच कऱ्हाडला परतलेला विरवडे येथील आशीष वीर म्हणाला, ''युक्रेनमधील युध्दाजन्य परिस्थिती असलल्या भागात सध्या वीज बंद आहे, नेटवर्क बंद आहे. त्यामुळे संपर्कच होत नाही. आम्ही राहत होतो तेथुन काही अंतरावर बॉम्बस्फोट सुरु होते. आम्हालाही बॉम्बस्फोट सुरु झाल्यावर बंकरमध्ये बसण्याच्या सुचना दिल्या होत्या. मात्र खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्रामुळे सुदैवाने मला विमान मिळून मी भारतात परतलो आहे.  

खासदारांकडून परराष्ट्र मंत्रालयाकडे पाठपुरावा

सातारा जिल्ह्यातील शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेलेले विद्यार्थी मायदेशी आणण्यासाठी खासदार श्रीनिवास पाटील यांच्याकडून प्रयत्न सुरु आहेत. जिल्ह्यातील संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांनीही त्यांच्याकडे मुले घरी परतण्यासाठी पाठपुरावा करण्याची विनंती केली आहे. त्यांनी स्वतः परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांना पत्र लिहून, त्यांच्याशी थेट दुरध्वनीवरुन संपर्क साधुन सातारा जिल्ह्यातील अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठीची कार्यवाही सुरु केली आहे.

(Russia Ukraine War News updates)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com