President Volodymyr Zelensky sarkarnama
देश

माझी हत्या करण्याचा रशियाचा कट ; युक्रेनच्या राष्ट्रपतींचा भावुक व्हिडिओ व्हायरल

जेलेंस्की (President Volodymyr Zelensky)यांनी व्हिडओच्या माध्यमातून सांगितले आहे. माझी हत्या करण्याचा रशियाचा कट असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

सरकारनामा ब्युरो

कीव : रशियाच्या (russia)युक्रेनवर (ukraine)हल्ल्याचा आज दुसरा दिवस आहे. गुरुवारी रशियाने केलेल्या हल्ल्यात युक्रेनमधील ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. रशियापासून मला व माझ्या कुटुंबियांच्या जीवाला धोका असल्याचे युक्रेनचे राष्ट्रपती वलोडिमिर जेलेंस्की (President Volodymyr Zelensky)यांनी व्हिडओच्या माध्यमातून सांगितले आहे. माझी हत्या करण्याचा रशियाचा कट असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

वलोडिमिर जेलेंस्की म्हणाले, ''रशियाच्या रडारवर सर्वात आधी मी आहे, त्यानंतर माझा परिवार आहे. जिवाला धोका असल्याचे माझा परिवारातील सर्व जण लपून बसले आहेत. माझी हत्या करुन युक्रेनला राजनैतिक दृष्ट्या नष्ट करण्याचा रशिया डाव आहे,''

जेलेंस्की म्हणाले, ''केंद्र सरकारच्या कामासाठी मी आवश्यक लोकांसोबत सरकारी निवासस्थानात राहत आहे. मी आणि माझा परिवार देशद्रोही नाही. रशियाचे सैन्य कीव परिसरात घुसले आहे. नागरिकाना कर्क्यूच्या नियमाचे पालन करावे,''

गुरुवारी झालेल्या हल्यात युक्रेनमधील १३७ जणांचा मृत्य झाला. यात दहा अधिकारी, १३ लष्करी जवानांचा समावेश आहे. तर ३१६ नागरिक जखमी झाले आहेत, असे जेलेंस्की यांनी सांगितले.

‘हल्ल्यात पहिल्या दिवशी युक्रेनमधील ७० हून अधिक लष्करी तळ उद्ध्वस्त केले आहेत.’असा दावा रशियाने केला आहे. पुतीन म्हणाले की, ‘जर रशियाच्या कारवाईत कोणी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यावर यापूर्वी कधीही न पाहिलेले परिणाम होतील.’ पुतीन यांनी थेट नाटो आणि अमेरिकेला इशारा दिला आहे.

युक्रेनने या युद्धामध्ये मध्यस्थी करण्याची मागणी भारताकडे केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा केली. यावेळी रशियाला चर्चेतून वाद मिटवा हिंसेचा मार्ग सोडा, असे मोदी पुतीन यांना म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT