Greta Vedler Sarkarnama
देश

पुतीन यांना मनोरुग्ण म्हटलेल्या 23 वर्षीय मॉडेलचा मृतदेह सापडला बॅगेत

मॉडेलने पुतीन यांचा उल्लेख मनोरुग्ण असा केला होता. त्यानंतर काही दिवसांतच ती गायब झाली होती.

सरकारनामा ब्युरो

मॉस्को : जगभरात सध्या रशिया आणि युक्रेनमधील युध्दाचीच (Russia Ukraine War) चर्चा आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) हे झुकण्यास तयार नाहीत. त्यामुळे अनेकजण त्यांच्यावर सडकून टीका करत आहेत. त्यातच एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. एका रशियन मॉडेलचा (Russian Model) मृतदेह बॅगेत सापडला आहे. या मॉडेलने पुतीन यांचा उल्लेख मनोरुग्ण असा केला होता. त्यानंतर काही दिवसांतच ती गायब झाली होती.

फॉक्स न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, तेवीस वर्षीय ग्रेटा वेडलर (Greta Wedler) हिने वर्षभरापूर्वी पुतीन यांना मनोरुग्ण म्हटलं होतं. तेव्हापासून ती गायब होती. पण त्यानंतरही तिची सोशल मीडिया अकाऊंट सुरूच होती. त्यामुळे ती गायब झाल्याची किंवा तिचा मृत्यू झाल्याचा संशय कुणालाही आला नव्हता. अखेर एका बॅगेत तिचा मृतदेह आढळून आल्यानंतर अनेक बाबींचा खुलासा झाला आहे.

ग्रेटा वेडलरची हत्या झाल्याचे समोर आलं आहे. तिचा मित्र दिमित्री कोरोविन यानेच हत्या केल्याची कबुली दिली आहे. गळा दाबून तिचा खून करण्यात आला आहे. त्यानंतर त्याने मृतदेह एका बॅगेत भरून कारमध्ये ठेवला. त्यानंतर रशियातील (Russia) लिपेटस्कमध्ये नेत तिथेच गाडी सोडून दिली. दोघांमध्ये पैशांवरून वाद झाल्यानंतर हत्या केल्याचे तपासात पुढे आले आहे.

ग्रेटाची हत्या आणि तिने पुतीन यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा कोणताही संबंध नसल्याचे सांगितले जात आहे. पण सध्याच्या रशिया-युक्रेन युध्दाच्या पार्श्वभूमीवर ग्रेटाच्या हत्येचा खुलासा झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे. त्यातून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कारण पुतीन यांच्याविषयी भाष्य केल्यानंतरच ती गायब झाली होती. आता तिचा मृतदेह सापडला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT