इतिहास लिहिला गेल्यास तुम्ही चुकीच्या बाजूला असाल! अमेरिकेचा भारताला सूचक इशारा

रशियाकडून युक्रेनवर जोरदार हल्ले सुरूच असून राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) माघार घेण्यास तयार नाहीत.
Narendra Modi- joe Biden
Narendra Modi- joe Biden Sarkarnama

वॉशिंग्टन : रशियाकडून (Russia) युक्रेनवर जोरदार हल्ले सुरूच असून राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) माघार घेण्यास तयार नाहीत. तर दुसरीकडे भारताने (India) रशियाकडून कमी दरात कच्चा तेलाची खरेदी करण्यावरून अमेरिकेकडून (America) सूचक इशारा देण्यात आला आहे. भारताने कोणत्याही प्रतिबंधांचं उल्लंघन केलेलं नसलं तरी इतिहासात या घटनेची नोंद चुकीच्या बाजूने होईल, असंही अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्याच्या भारताच्या निर्णयावर अमेरिकेकडून एकप्रकारे नाराजीच व्यक्त करण्यात आल्याचे मानले जात आहे. याबाबत व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव जेन साकी यांनी मंगळवारी स्पष्ट केलं की, आम्ही घातलेल्या निर्बंधांचे पालन प्रत्येक देशांने करायला हवेत. भारताने कमी दरात कच्चा तेलाची खरेदी करण्याची रशियाची ऑफर निर्बंधांचे उल्लंघन करत नाही, असं साकी यांनी स्पष्ट केलं. (Russia Ukraine War)

Narendra Modi- joe Biden
विमान प्रवास महागणार? विमान इंधन 17 हजारांनी महागलं; एक किलोलिटरला 1.10 लाख

साकी यांनी भारताच्या भूमिकेला थेट विरोध केला नसला तरी त्यांनी तसे सूचक संकेत दिले आहेत. भारताचा हा निर्णय इतिहासाच्या चुकीच्या बाजूला ढकलेल, असं त्या म्हणाल्या. या घटनांबाबत इतिहासाची पुस्तकं लिहिली जातील, त्यावेळी तुम्ही कुठे असावे, याचा विचार करावा. रशियाच्या नेतृत्वाला सहकार्य म्हणजे हल्ल्याचे समर्थन. ज्याचे विनाशकारी परिणाम होत आहेत, असं साकी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भारताने युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्याचे समर्थन केलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेत सामंजस्याने मतभेद मिटवण्याचा आग्रह केला आहे. तसेच रशियाविरोधात संयुक्त राष्ट्रसंघामध्ये आलेल्या विविध प्रस्तावांवरील मतदानातही भारताने सहभाग घेतलेला नाही. प्रत्येकवेळी भारताने तटस्थ भूमिका घेतली आहे.

Narendra Modi- joe Biden
राणे पिता-पुत्राला अर्टी-शर्तीसह जामीन मंजूर ; म्हणाले, 'दिशाला न्याय देणार'

एलॉन मस्कचं पुतीन यांना थेट आव्हान

इलेक्ट्रिक कार निर्मितीत आघाडीवर असलेल्या टेस्ला (Tesla) कंपनीचे सर्वेसर्वा एलॉन मस्कनं (Elon Musk) यांनी युध्दात उडी घेतली आहे. एलॉन मस्क यांनी आपल्या कंपनीचे रशियातील कामकाज यापूर्वीच थांबवलं आहे. आता त्यांनी थेट पुतीन यांच्याशी पंगा घेतला आहे. मस्क यांनी ट्विट करत पुतीन यांना आव्हान दिलं आहे. मी पुतीन यांना आमने-सामने लढण्याचं आव्हान देतो. युक्रेनवर दाव लावला जाईल. तुम्ही लढाईसाठी तयार आहात का, असा सवाल करत मस्क यांनी थेट पुतीन यांना मैदानात उतरण्याचं आव्हान दिलं आहे. (Elon Musk challenges Vladimir Putin news updates)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com