New Delhi : विरोधकांच्या टीकेनंतर लोकसभेत मोदी सरकारकडून ऑपरेशन सिंदूरवर सर्वपक्षीय चर्चेसाठी 16 तासांचा वेळ राखून ठेवण्यात आला आहे. या चर्चेदरम्यान,आणि आधीही विरोधकांकडून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावामुळेच भारत-पाकिस्तानमध्ये सुरू असलेलं युध्द अचानक थांबवण्यात आल्याची टीका केली जात होती. तसेच ट्रम्प यांनीही याबाबत ट्विट करत आणि कधी मीडियाशी बोलताना आपण भारत- पाकिस्तान यांच्यातलं युध्द थांबवल्याचा दावाही केला होता. आता यावर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S.Jaishankar) यांनी ट्रम्प यांच्यासह विरोधकांचे दावे खोडून काढले आहे.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी लोकसभेत सोमवारी(ता.28) याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात 22 एप्रिल (पहलगाम हल्ला) ते 17 जून (युद्धबंदी) दरम्यान कोणताही फोन झालेला नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी संसदेत दिलं आहे.
काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण भारत व पाकिस्तानमधील (India Vs Pakistan War) एक मोठा संघर्ष थांबवला, संभाव्य अणू युद्ध रोखलं असं विधान केलं होतं. त्यावेळी त्यांनी मी पाकिस्तानशी बोललो, मी भारताशीही बोललो. या दोन्ही देशांचे नेते खूप चांगले आहे. ते शक्तीशाली आहेत. मात्र, ते आपसांत लढत होते. या देशांमध्ये अणू युद्ध झालं असतं असंही ट्रम्प म्हणाले होते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मी दोन्ही देशांना इशारा दिला की, तुमच्यातील युद्ध असंच चालू राहिलं तर आम्ही तुमच्याबरोबरचा व्यापार थांबवू. त्यानंतर त्यांनी युद्ध थांबवलं. दोन्ही देशांचे प्रमुख नेते हुशार आहेत. त्यांनी योग्य निर्णय घेतल्याचा दावाही ट्रम्प यांनी केला होता. यामुळे मोदी सरकारला पावसाळी अधिवेशनात घेरण्यासाठी विरोधकांना मोठा मुद्दा मिळाला होता.
यापूर्वी काँग्रेस नेते गौरव गोगोई यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी 26 वेळा युद्धबंदी थांबवल्यासाठी व्यापार करारांचा वापर केल्याचा दावा केला होता. भारताने ट्रम्प यांचे दावे ठामपणे आणि वारंवार फेटाळून लावले आहेत आणि जम्मू-काश्मीरवरील पाकिस्तानच्या बेकायदेशीर कब्जावर तोडगा काढण्यासाठी 'मध्यस्थी' करण्याच्या त्यांच्या ऑफरलाही नकार दिला होता.
जयशंकर म्हणाले, भारत आपल्या भूमीवर दहशतवादी कारवाया सहन करणार नाही आणि आपल्या नागरिकांचं रक्षण करण्याचा अधिकार राखून ठेवतो. "पहलगाम हल्ल्यानंतर एक मजबूत आणि दृढ संदेश देणं महत्त्वाचं होते... एक लाल रेषा ओलांडली गेली आणि त्याचे गंभीर परिणाम होतील हे आपल्याला स्पष्ट करावे लागले," असे ते म्हणाले.
1960 च्या सिंधू पाणी कराराच्या रद्द करण्यापासून ते पाकिस्तानसोबत असलेले राजनैतिक,व्यावहारिक तोडलेले संबंध या अशा विविध आक्रमक पावलांनी पाकिस्तानची मोठी कोंडी झाल्याचेही परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी सांगितले.
जयशंकर म्हणाले की, भारत आपल्या भूमीवर दहशतवादी कारवाया सहन करणार नाही आणि आपल्या नागरिकांचे रक्षण करण्याचा अधिकार राखून ठेवतो. "पहलगाम हल्ल्यानंतर एक मजबूत आणि दृढ संदेश देणे महत्त्वाचे होते... एक लाल रेषा ओलांडली गेली आणि त्याचे गंभीर परिणाम होतील हे आपल्याला स्पष्ट करावे लागले," असेही त्यांनी सांगितले.
दहशतवादाबाबत भारताच्या नव्या धोरणांचे स्पष्टीकरण देण्यासाठी अमेरिकेसह इतर देशांमध्ये सर्वपक्षीय क्रॉस-पार्टी शिष्टमंडळे पाठवणे या संदेशाचा ताकदीचा पुरावा म्हणजे संयुक्त राष्ट्रांच्या 190 सदस्यांपैकी फक्त तीन देशांनी ऑपरेशन सिंदूरला विरोध केल्याचंही जयशंकर म्हणाले.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत ऑपरेशन सिंदूरवर माहिती दिली. ते म्हणाले, 'आम्ही दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारले. आमच्या माता-भगिनींच्या सिंदूरचा बदला लष्कराने दहशतवाद्यांकडून घेतला. आमचे उद्दिष्ट दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करणे होते आणि सैन्याने त्यांचे ध्येय साध्य केले. आम्ही पाकिस्तानच्या दबावाखाली युद्धबंदी केली नसल्याचंही सिंह यांनी विरोधकांना ठणकावलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.