Shivsena News: काँग्रेस पाठोपाठ आता महायुतीतील शिंदेंच्या शिवसेनेलाही घोळाची शंका? मतदारयाद्या तपासण्याचे दिले निर्देश

Assembly Election 2024 Result : विधानसभेच्या निवडणुकीत मतदारयाद्यांमध्ये मोठा घोळ होता, अनेक बोगस मतदारांच्या नोंदी केल्या असल्याची शंका काँग्रेसने व्यक्त केली आहे. या बोगस मतदारांच्या भरोशावर भाजप जिंकली असल्याचा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा आरोप आहे.
Eknath shinde Voter List  .jpg
Eknath shinde Voter List .jpgSarkarnama
Published on
Updated on

थोडक्यात बातमी:

  1. मतदारयाद्यांतील घोळावर शंका: काँग्रेसनंतर आता शिंदे गटाचाही मतदार याद्यांतील बोगस नोंदींवर संशय; यासाठी शिवसेना याद्या पडताळणार.

  2. शिवसेनेचा प्रशिक्षण उपक्रम: शिवसेना सर्व जिल्हा, शहर व बुथ प्रमुखांना मतदार याद्या तपासण्याचे प्रशिक्षण देणार असून सॉफ्टवेअरही उपलब्ध करणार.

  3. नवीन कार्यालयांची स्थापना: प्रत्येक जिल्ह्यासाठी मुंबईवरून दोन भगव्या रंगाची रेडिमेड कार्यालये पाठवली जाणार असून जनतेच्या तक्रारी नोंदवण्यासाठी त्यांचा उपयोग होणार.

Nagpur News : विधानसभेच्या निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ होता, अनेक बोगस मतदारांच्या नोंदी केल्या असल्याची शंका काँग्रेसने व्यक्त केली आहे. या बोगस मतदारांच्या भरोशावर भाजप जिंकली असल्याचा काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा आरोप आहे. हा घोळ शोधून काढण्यासाठी काँग्रेसने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेत एक समिती स्थापन केली आहे. आता शिवसेनेनेसुद्धा मतदारयाद्यांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

आता शिवसेनेकडूनही (Shivsena) मतदारयाद्यांची पडताळणी करण्यासाठी शिवसैनिकांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे तसेच याकरिता अद्ययावत असे सॉफ्टवेअर उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या माध्यमातून बोगस आणि दुबार मतदार यांचा शोध घेतला जाणार आहे.

या बैठकीला आमदार तसेच रामटेक लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख कृपाल तुमाने, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, शिवसेनेचे सचिव वैभव थोरात, नागपूरचे संपर्क प्रमुख मनोहर चंद्रिकापुरे, शहर प्रमुख सूरज गोजे, जिल्हा प्रमुख संदीप इटकेलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थित होते.

Eknath shinde Voter List  .jpg
Congress Challenge to CM Fadnavis : मुख्यमंत्र्यांना काँग्रेसचे गुडधे यांचे पुन्हा चॅलेंज, आता सर्वोच्च न्यायालयात धाव

या बैठकीत मतदारयाद्या तपासणी कशी करायची याची थोडक्यात माहिती देण्यात आली. लवकरच याचे सर्व जिल्हा प्रमुख, शहर प्रमुख तसेच बुथ प्रमुखांसह पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

मतदारयाद्यांची पडताळणीच्या माध्यमातून बोगस मतदार आणि दुबार मतदारांचाही शोध घेतल्या जाणार आहे. विधानसभा आणि बुथ निहाय सर्व मतदार याद्या तपासल्या जाणार आहेत. सोबतच 18 वर्षे पूर्ण झालेल्या मतदारांचाही नव्या याद्यांमध्ये समावेश केला जाणार आहे.

Eknath shinde Voter List  .jpg
Dharashiv News: धाराशिवमधून मोठी बातमी: तानाजी सावंतांना पुन्हा डावललं; राजन साळवींसमोरच समर्थकांचा जोरदार राडा

मुंबईतून येणार दोन कार्यालय

शिवसैनिकांच्या सोयीसाठी आणि जनतेच्या तक्रारीच्या नोंदी ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला दोन रिडिमेड कार्यालय दिले जाणार आहे. या कार्यालयात स्टेशनरीपासून सर्वच सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. भगव्या रंगाचे हे कार्यालयात मुंबईवरून पाठवण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात एक कार्यालय पोहोचले आहेत.

  1. प्रश्न: मतदारयाद्यांत घोळ असल्याचा आरोप सर्वप्रथम कुणी केला?
    उत्तर: काँग्रेसने घोळाचा आरोप केला आणि समिती स्थापन केली.

  2. प्रश्न: शिवसेनेने मतदारयाद्यांबाबत काय निर्णय घेतला आहे?
    उत्तर: याद्यांची पडताळणी करून बोगस मतदार शोधण्याचा निर्णय घेतला आहे.

  3. प्रश्न: शिवसेनेने मतदारयाद्या तपासण्यासाठी काय सुविधा दिल्या आहेत?
    उत्तर: पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण, विशेष सॉफ्टवेअर आणि रेडिमेड कार्यालयांची सुविधा दिली जाणार.

  4. प्रश्न: नवीन मतदारांचा समावेश कसा केला जाणार आहे?
    उत्तर: 18 वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांना नव्या मतदारयाद्यांत समाविष्ट केले जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com