Saayoni Ghosh Sarkarnama
देश

West Bengal politics : बंडखोरी करत सत्ताधारी पक्षाला साथ, मतदारसंघात जाताच संतापलेले लोक खासदारांना तोंडावर म्हणाले, गद्दार... बेईमान...

Saayoni Ghosh, Saayoni Ghosh news, TMC MP : सायोनी घोष यांच्यासह इतरांनी एनडीएला पाठिंबा दिला आहे. असे असूनही त्यांच्याविरोधातही लोक घोषणाबाजी करत आहेत.

Rajanand More

Trinamool Congress news : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. तब्बल २० खासदार आणि ६० हून अधिक आमदारांनी बंड केले. त्यानंतर पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यासोबत असलेल्या नेत्यांच्या अंगावर अंडीफेक करण्याच्या घटना घडल्या. त्यांच्याविरोधात नारेबाजीही होत आहे. भाजप कार्यकर्त्यांकडून हे कृत्य केले जात असल्याचा आरोप होत आहे. आता बंडखोर आमदार, खासदारांविरोधातही लोकांचा संताप दिसू लागला आहे.

खासदार सायोनी घोष यांना मंगळवारी लोकांच्या नाराजीचा सामना करावा लागला आहे. त्यांच्या जादवपूर मतदारसंघातील बरुईपूर भागात एका १२ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची करण्यात आल्याचे समोर आले आहे. या घटनेतील मुख्य आरोपी प्रभास मंडल याचा बुधवारी रात्री पोलिसांनी एन्काऊंटर केला. तर एका आरोपीचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाला आहे.

मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी मंगळवारी खासदार घोष यांच्यासह सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेत्यांची रीघ लागली होती. तृणमूलमधील निलंबित करण्यात आलेले आमदार ऋतब्रता बॅनर्जी यांनी कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांच्यासह काही बंडखोर नेतेही होते. त्यांना मंगळवारी स्थानिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. घोष, बॅनर्जी यांना लोकांनी तोंडावर गद्दार, बेईमान असे म्हटले. स्थानिकांकडून जोरदार घोषणाबाजी केली जात होते.

किती पैसे घेतले, असेही सायोनी घोष यांना म्हणताना लोक म्हणत होते. खरंतर सायोनी घोष यांच्यासह २० खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करत एनसीपीआय या पक्षात विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांनी केंद्रात एनडीए सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णयही जाहीर केला आहे. तृणमूलच्या नेत्यांविरोधातील राग लोकांकडून व्यक्त केला जात असल्याचे भाजपचे नेते म्हणत आहे.

घोष यांच्यासह इतरांनी एनडीएला पाठिंबा दिला आहे. असे असूनही त्यांच्याविरोधातही लोक घोषणाबाजी करत आहेत. आता लोकांकडून बंडखोर नेत्यांविरोधातील रागही व्यक्त होऊ लागल्याने हे लोक नेमके कोण आहेत, अशाही चर्चा सुरू झाल्या आहेत. जादवपूर हा घोष यांचा मतदारसंघ आहे. तिथेही त्यांना रोषाला सामोरे जावे लागत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT