Sakal Lok Sabha Election 2024 Survey Sarkarnama
देश

Sakal Lok Sabha Election 2024 Survey : 'इंडिया'साठी 'हा' मुद्दा ठरणार धोक्याचा तर भाजपसाठी 'प्लसपाॅइंट'!

Deepak Kulkarni

Sakal Lok Sabha Election 2024 Survey News : लोकसभा निवडणुकीत एकमेकांचा पाडाव करण्याच्या इराद्याने सत्ताधारी-विरोधकांनी आपापली शस्त्रे परजून ठेवली आहेत. पुढच्या शंभर-सव्वाशे तासांत आचारसंहिता लागू होऊन प्रत्यक्ष इलेक्शन युद्धाला प्रारंभ होणार आहेत. हे युद्ध जिंकून सत्ता बळकाविण्यासाठी भाजपने गनिमी कावा करत, विरोधी बाकांवरच्या नेत्यांवर फासे टाकण्यास सुरुवात केली आहे, तर उरल्यासुरल्या ताकदीनिशी सत्ताधीश भाजपला हरविण्याची विरोधी महाविकास आघाडीची रणनीती आहे.

ही लढाई जिंकून तिसऱ्यांदा दिल्लीतील सत्तेच्या गादीवर बसण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी तयार आहेत. अर्थात, भाजपकडे पंतप्रधानपदाचा उमेदवार आहे. परंतु, विरोधकांकडे मोदींना तोंड देऊ शकेल, असा चेहरा तूर्त तरी नसल्याचे दिसत आहे. पण लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचा चेहरा महत्त्वाचा असल्याचे मतदारांनी राजकीय पक्षांना आवर्जून सांगितले.

लोकसभा निवडणुकीत देशात एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी तर राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार आहे. मात्र, आगामी निवडणुकीत 'सकाळ मीडिया'ने केलेल्या सर्व्हेमध्ये महाराष्ट्राचा कल कसा असणार आहे हे समोर आलं आहे. यात मोदी करिष्मा चालणार की राहुल गांधी भाजपला सत्तेपासून दूर ठेवणार, महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस असे दोन दिग्गज पक्ष फुटल्यानंतर मतदारांची साथ कोणाला मिळणार असे एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे या सर्व्हेत समोर आली आहेत.

महाराष्ट्र आणि देशाचे राजकीय मन जाणून त्यातून मत मांडण्याच्या उद्देशाने 'सकाळ मीडिया'च्या वतीने उमेदवार जाहीर होण्याआधी सर्वेक्षण करण्यात आले. त्यातून पुणे, मुंबईसह राज्यभरातील 48 लोकसभा मतदारसंघांतील मतदारांची मते जाणून घेण्यात उमेदवार जाहीर होण्याआधी सर्वेक्षण करण्यात आले. त्यातून पुणे, मुंबईसह राज्यभरातील 48 लोकसभा मतदारसंघांतील मतदारांची मते जाणून घेण्यात आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सकाळ मीडिया ग्रुपने केलेल्या महासर्व्हेत पंतप्रधानपदाचा चेहरा हा महत्त्वाचा फॅक्टर आहे असे 21.04 टक्के लोकांना वाटते. आणि तोच लोकसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरण्याचीही शक्यता आहे, तर पक्षही तितकाच महत्त्वाचा असल्याचे मत 12.9 टक्के लोकांनी व्यक्त केले आहे, पण भाजपकडून पुढे करण्यात येत असलेला हिंदुत्वाच्या मुद्द्याला यात मतदारांच्या दृष्टीने फारसं महत्त्वाचं नसल्याचे समोर आले आहे.

तसेच स्थानिक उमेदवारांची लोकप्रियता निवडणुकीत त्या त्या राजकीय पक्षांना फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे, तर नेत्यांनी केलेली कामेच त्यांना तारणार आहे, तर पक्ष, विकासकामे, अजेंडा, जाहीरनामे मतदारसंघात आणलेला निधी, मतदारसंघात पूर्णत्वास गेलेली विकासकामे, उमेदवाराची जात- धर्म याही बाबीही मतदारांसाठी महत्त्वाच्या ठरण्याची शक्यता आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT