Sam Pitroda  Srakarnama
देश

Sam Pitroda News : वादग्रस्त सॅम पित्रोदा यांच्यावर काँग्रेसचा पुन्हा 'वरदहस्त'; थेट 'या' पदावर नियुक्ती

Congress Political News : सॅम पित्रोदा यांनी वादग्रस्त वक्तव्यानंतर इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पित्रोदा यांनी अनेकवेळा काँग्रेस पक्षासमोर अडचणी निर्माण केल्या होत्या.

Sachin Waghmare

New Dehli : इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदी सॅम पित्रोदा यांची पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी सांयकाळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पित्रोदा यांच्या नियुक्तीची घोषणा केली.

त्यांच्या निवडीची माहिती काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी दिली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सॅम पित्रोदा (Sam Pitroda) यांची इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदी फेरनियुक्ती केली आहे. (Sam Pitroda News)

सॅम पित्रोदा यांनी वादग्रस्त वक्तव्यानंतर इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पित्रोदा यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात अनेकवेळा आपल्या वक्तव्यामुळे काँग्रेस (Congress) पक्षासमोर अडचणी निर्माण केल्या होत्या. अलीकडेच सॅम पित्रोदा यांनी भारतातील विविधतेवर वक्तव्य केले होते.

निवडणुकीदरम्यान केलेल्या पित्रोदा यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसची अडचण झाली होती. यानंतर त्यांनी इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा त्यांनी राजीनामा दिला होता. सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणातील वारंगल येथे लोकसभा निवडणूक रॅलीला संबोधित करताना टीका केली होती. त्यांच्या या वक्तव्यावरून ऐन निवडणूक काळात काँग्रेससमोरील अडचणी वाढल्या होत्या.

लोकसभा निवडणुकीच्या काळात या मुद्द्यावरून आधीच वाद निर्माण झाला होता. सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसला चौफेर हल्ल्यांना सामोरे जावे लागले. त्यावेळी काँग्रेस पक्षाने म्हटले होते की पित्रोदा यांचे विचार नेहमीच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थिती दर्शवतात असे नाही. अनेक वेळा त्यांची ही मते वैयक्तिक असतात असे स्पष्ट केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT