Marathwada Congress Politics News : मराठवाड्यात तीन खासदार निवडून आल्याने काँग्रेसमध्ये जान आली..

Congress Political News : मराठवाड्यातील आठ पैकी तीन लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने महाविकास आघाडीच्या साथीने विजय मिळवला. राज्यात मराठा आरक्षणासाठी सुरु असलेला लढा आणि त्यातून निर्माण झालेला मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष काँग्रेस महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडला.
Congress News
Congress NewsSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : गेल्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात पाटी कोरी असलेल्या काँग्रेस पक्षाला 2024 ची निवडणूक मात्र पावली. एक नव्हे, दोन नव्हे तर मराठवाड्यातील आठ पैकी तीन लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने महाविकास आघाडीच्या साथीने विजय मिळवला. राज्यात मराठा आरक्षणासाठी सुरु असलेला लढा आणि त्यातून निर्माण झालेला मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष काँग्रेस महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडला.

संपुर्ण राज्यात एक खासदार असलेल्या काँग्रेसची (Congress) यंदाच्या निवडणुकीत लाॅटरी लागली आणि त्यांचे महाराष्ट्रात 13 खासदार निवडून आले. विशेष म्हणजे काँग्रेसकडून दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्री पद भुषवलेले अशोक चव्हाण ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडून भाजपमध्ये गेले होते.

पण चव्हाण यांचे भाजपमध्ये जाणेही मराठवाड्यात काँग्रेसच्या फायद्याचेच ठरले. अशोक चव्हाण यांच्या घरात म्हणजेच नांदेड मतदारसंघात काँग्रेसने भाजपला धूळ चारली. याठिकाणी काँग्रेसचे वसंत चव्हाण विजयी झाले.

लोकसभेच्या जालना आणि लातूर मतदारसंघातही हीच परिस्थिती झाली. जालना लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या डाॅ. कल्याण काळे (Kalyan Kale) यांनी सलग पाच टर्म खासदार, दोन वेळा केंद्रात राज्यमंत्री राहिलेल्या भाजपच्या रावसाहेब दानवे यांचा लाखावर मताधिक्याने पराभव केला.

लातूरमध्ये काँग्रेसने माजी मंत्री विद्यमान आमदार अमित देशमुख, धिरज देशमुख आणि त्यांचे काका माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भाजपला दणका देत त्यांची हॅट्रीक रोखली.

काँग्रेसने भाजपच्या सुधाकर शृंगारे यांचा पराभव करत नवख्या डाॅ. शिवाजी काळगे यांना निवडून आणले. हा विजय काँग्रेससाठी जिल्ह्यात कमबॅक करणारा ठरला. एकूणच मराठवाड्यातील जालना, नांदेड, लातूर या मतदारसंघात विजय मिळाल्याने मरगळलेल्या काँग्रेस पक्षात पुन्हा जान आली. महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या दोनही पक्षापेक्षा काँग्रेसचा स्ट्राईक रेट मराठवाडा आणि राज्यात चांगला राहिला.

Congress News
Video Vijay Wadettivar News : चहापानावर विरोधकांचा बहिष्कार; महायुतीचे सरकार विश्वासघातकी, वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

या विजयामुळे संजिवनी मिळालेली काँग्रेस आता रस्त्यावर उतरून आंदोलन करताना दिसू लागली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसने आज शहरातील हज हाऊसमध्ये सुरू करण्यात आलेल्या अल्पसंख्याक आयुक्तालयाच्या कार्यालयाच्या विरोधात आंदोलन केले. अल्पसंख्याक आयुक्त कार्यालय सरकारने मंजूर केले त्याबद्दल आभार व्यक्त करतानाच हे कार्यालय हज हाऊसमध्ये नको, तर स्वतंत्र जागेत सुरु करावे, अशी मागणी करत काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले.

काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना टाॅनिक

पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर अल्पसंख्याक आयुक्त कार्यालायाचा उद्घाटन समारंभ राज्याचे अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. याच कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेतून जालन्याचे खासदार कल्याण काळे यांचे नाव गायब असल्याचा मुद्दा उपस्थितीत करत काँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत निषेध नोंदवला.

एकूणच लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील विजयाने काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना टाॅनिक मिळाले आहे. आता आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा जोश आणखीणच वाढताना दिसेल.

Congress News
Congress Agitation Vs BJP : काँग्रेस महायुती सरकारविरोधात 'चिखल फेको' आंदोलन करणार!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com