Akhilesh Yadav News  sarkarnama
देश

Samajwadi Party : भाजपचं टेन्शन वाढलं ; सपाचं ‘ओबीसी कार्ड’, अखिलेश यांचा नवा प्लॅन !, 'ब्राह्मण-ठाकुरांना...'

Akhilesh Yadav Played Obc Card : १४ राष्ट्रीय महासचिवामध्ये एकही ब्राह्मण किंवा ठाकूर समाजातील चेहऱ्याला स्थान दिलेले नाही,

Mangesh Mahale

Akhilesh Yadav Played Obc Card : समाजवादी पार्टीने (samajwadi party) आपली राष्ट्रीय कार्यकारणी नुकतीच जाहीर केली आहे. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव (akhilesh yadav) यांनी दलित आणि मुस्लिम मतदारांसाठी नवीन समीकरण जुळविण्याचा प्रयत्न केला आहे.

समाजवादी पार्टी म्हणजे यादव, आणि मुस्लिम समाज हे सर्वश्रृत आहे, पण या राष्ट्रीय कार्यकारणीच्या माध्यमातून अखिलेश यादव यांनी आता ‘ओबीसी कार्ड’ खेळण्याचे निश्चित केल्याचे दिसते.

नवीन कार्यकारणीत राष्ट्रीय अध्यक्ष, उपाध्यक्ष, प्रमुख राष्ट्रीय महासचिव, राष्ट्रीय महासचिव, राष्ट्रीय सचिव आदी पदांची घोषणा अखिलेश यादव यांनी केली आहे. पक्षाच्या १४ राष्ट्रीय महासचिवामध्ये एकही ब्राह्मण किंवा ठाकूर समाजातील चेहऱ्याला स्थान दिलेले नाही, तर ओबीसी समाजाला मोठ्या प्रमाणात नवीन कार्यकारणीत स्थान देण्यात आले आहे.

दलित, मुस्लिम समाजालाही महत्वाची पदे

१४ राष्ट्रीय महासचिवांमध्ये ओबीसी समाजातील रवी प्रकाश वर्मा, स्वामी प्रसाद मौर्य , विश्वंभर प्रसाद निषाद, लालजी वर्मास राम अचल राजभर, हरेंद्र मलिक, नीरज चौधरी यांचा समावेश आहे. ओबीसी समाजाला पक्षात मोठी पदे देण्यात आली आहेत. याबरोबर दलित, मुस्लिम समाजालाही महत्वाची पदे देण्यात आली आहेत.

अखिलेश राष्ट्रीय अध्यक्ष, काकांना मोठ गिफ्ट..

अखिलेश यादव यांचे काका शिवपाल यादव यांची राष्ट्रीय महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अखिलेश यादव यांची पुन्हा एकदा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.

या कार्यकारणीवरुन असे लक्षात येते की आता सपामध्ये ब्राह्मण आणि ठाकूर समाजाला डावलण्यात आले आहे.ओबीसी आणि दलिताकडे नेतृत्व देऊन सपा येत्या निवडणुकीत नवीन राजकीय डाव खेळणार असल्याचे समजते. हे भाजपसाठी मोठे आवाहन आहे.

२०२४ मध्ये उत्तरप्रदेशातील लोकसभा निवडणुकीसाठी सपाची रणनीती आहे. ब्राह्यण आणि ठाकूरांचे मत भाजपला जात असल्यामुळे त्यांचा सपाला फारसा फायदा होत नसल्याने सपाने या दोन्ही समाजाला दूर ठेवलं असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

उत्तरप्रदेशातील लोकसभेच्या ८० जागापैकी भाजप ६४ जागा मिळाल्या आहेत. १० जागा बहुजन समाज पक्ष, तीन जागा सपा, तर एका जागा ही काँग्रेसला मिळाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT