लखनैा : उत्तरप्रदेशात (uttar pradesh election) भाजप (BJP)सत्ता स्थापन करण्याची तयारी करीत आहे. तर दुसरीकडे समाजवादी पार्टीच्या (samajwadi party) पराभवामुळे एका कार्यकर्त्यांने गोळी मारुन आत्महत्या केली आहे.
समाजवादी पार्टीच्या पराभवानंतर हा कार्यकर्ता खूपच तणावाखाली होता. सपाच्या पराभवानंतर काही स्थानिक नागरिकांनी त्याला चिडविण्याचा प्रयत्नही केला होता. त्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जाते.
देवेंद्र यादव बबलू (वय ४०, रा. माधोगंज, बीलग्राम, हरदोई) असे या मयत सपाच्या कार्यकर्त्याचे नाव आहे. आपल्या पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्याची जबाबदारी देवेंद्र यादव बबलू याच्याकडे होती. पण त्याला त्यात यश मिळाले नाही. सपाच्या पराभवानंतर ते काही दिवसापासून तणावाखाली होते. काल त्यांनी त्यांच्या घरी दुसऱ्या मजल्यावर गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांच्यामागे पत्नी, तीन मुले असा परिवार आहे.
उत्तरप्रदेशात भाजपला २५५, निषाद पार्टीला ६, अपना दल (सोनेलाल) १२, सपाला १११, राष्ट्रीय लोकदल (आरजेडी) ८, एसबीएसपीला ६ जागा मिळाल्या आहेत. निकालानंतर योगी आदित्यानाथ यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकींमध्ये भाजपाने बहुमताने विजय मिळवला आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये नवीन मंत्रीमंडळ आणि सरकार स्थापनेसाठी भाजप पक्षाच्या बैठका पार पडत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दिल्ली दौरा करणार आहेत. दिल्लीतील या महत्तवाच्या बैठकीत योगी मंत्रिमंडळातील चेहऱ्यांची यादी ठरणार आहे.
योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाले असले मात्र तरीही योगी मंत्रिमंडळातील इतर पदांवर कोणाला स्थान मिळेल हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे याचपार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांची दिल्लीला महत्तवाची बैठक पार पडणार असून मंत्रिमंडळातील चेहऱ्यांची यादी ठरणार आहे.
या बैठकीसाठी उत्तर प्रदेश भाजपचे अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह, संघटन मंत्री सुनील बन्सल, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य दिल्लीला पोहचले आहेत. तसेच या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.