पुणे : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पेन ड्राईव्ह (Fadnavis Pen Drive)प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. या प्रकरणातील माजी सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी (Pravin Chavan)पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तेजस मोरे (Tejas More)यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
गोपनीयता भंग, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा याचा भंग केल्याने गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार चव्हाण यांनी केली आहे. प्रवीण चव्हाण यांच्या ऑफिसमध्ये केलेलं स्टिंग हे तेजस मोरे यांनी केल्याचा चव्हाण यांनी आरोप केला आहे. देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सादर केलेल्या पेन ड्राईव्ह नंतर संपूर्ण नाट्याला सुरुवात झाली होती. त्यामुळे अधिवेशनात गदारोळ झाला होता. प्रवीण चव्हाण यांनी काल राजीनामा दिला आहे.
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांच्यावर अनेक आरोप केले होते. ते आरोप फेटाळून लावत तेजस मोरे या त्यांच्या आशिलाने कॅमेरा असलेलं घड्याळ त्याच्या ऑफिसमध्ये लावल्याचं चव्हाण यांनी सांगितले आहे.
''हे घड्याळ त्यानेच आणलं होतं. आधी त्याने एसी लावण्याचा प्रयत्न केला त्याला मी स्पष्ट नकार दिला. त्यानंतर स्मार्ट टीव्ही लावण्याचा सुद्धा त्याने प्रयत्न केला. मी मुंबईला गेलेलो असताना त्याने हे घड्याळ इथे लावलं. त्यासाठी लागणारा इलेक्ट्रिक त्यानेच आणला होता, असे चव्हाण यांचे म्हणणे आहे.
''मी त्याला म्हटलं होतं हे घड्याळ इथे लावण्याची गरज नाही. त्याने नंतर काढतो असं सांगितलं. माझ्याकडे वेळ नव्हता. इतर केसेससाठी मी नागपूर आणि इतर ठिकाणी जात असतो. त्याचा गैरफायदा घेऊन मॅन्यूपुलेशन त्याने स्टिंग ऑपरेशन द्वारे केले आहे. त्यामध्ये ओव्हरलॅपिंग, लिपसिंग अश्या इतर बाबी करण्यात आल्या आहेत, असे चव्हाण यांनी सांगितले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.