Akhilesh Yadav, Saleem Shervani Sarkarnama
देश

Akhilesh Yadav News : अखिलेश यांना चौथा झटका; सलीम शेरवानींनी दिला राजीनामा

Rajanand More

Uttar Pradesh News : समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांना लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा झटका बसला आहे. राष्ट्रीय लोकदलाचे नेते जयंत चौधरी यांनी एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी 'सपा'च्या महासचिवपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आमदार पल्लवी पटेलांनी राज्यसभेच्या निवडणुकीत विरोधात जाण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर आज अखिलेश यांना चौथा धक्का बसला आहे. (Akhilesh Yadav News)

समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) महासचिव सलीम शेरवानी यांनी तडकाफडकी पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षात मुस्लिमांची उपेक्षा होत असल्याच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचे त्यांनी अखिलेश यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. लवकरच पुढील निर्णय घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

मीडियाशी बोलताना शेरवानी यांनी पक्षातून बाहेर पडणार असल्याचेही संकेत दिले. ते म्हणाले, हे आज घडलेले नाही. राज्यसभा उमेदवारांच्या नावाची घोषणा केल्यापासून हे सुरू आहे. पक्ष जो उद्देश डोळ्यासमोर ठेवून निवडणुकीत उतरणार आहे, त्याच उद्देशाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आम्ही पक्षात का थांबायचं? इंडिया आघाडीबाबत (India Alliance) कुणीच गंभीर नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यसभेला (Rajya Sabha) डावलल्याबाबत शेरवानी म्हणाले, मुस्लिम समाजातीच सातत्याने उपेक्षा होत आहे. राज्यसभा निवडणुकीतही कुणाला तिकीट दिले नाही. माझ्या नावाचा विचार नसता तरी चालले असते, पण एखाद्या मुस्लिम व्यक्तीला उमेदवारी मिळायला हवी होती. सपामध्य राहून मुस्लिमांच्या स्थितीत परिवर्तन आणू शकत नाही.

कोण आहेत सलीम शेरवानी?

सलीम शेरवानी हे बदायू लोकसभा मतदारसंघातून पाचवेळा खासदार झाले आहेत. त्यांनी चारवेळा समाजवादी पक्षाच्या तिकीटावर तर एकदा काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक जिंकली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीआधी त्यांनी सपा सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. निवडणुकीत पराभवानंतर ते पुन्हा सपामध्ये आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT